न्यूझीलंडचा माजी खेळाडू मिशेल जॉन मैक्ग्लाशनने पाकिस्तानचा माजी क्रिकेट हसन राजा याला खडेबोल सुनावले आहेत. पाकिस्तान न्यूज चॅनेलवर झालेल्या चर्चेत हसन राजाने आयसीसी किंवा अम्पायर्स भारतीय संघाला नवीन चेंडू देत आहेत का? याची पाहणी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. यानंतर मिशेलने हसन राजावर उपहासात्मकपणे टीका करताना त्याचं मानसिक आरोग्य तपासलं पाहिजे असं म्हटलं आहे.
गुरुवारी भारताने श्रीलंकेचा 302 धावांनी मोठा पराभव केला. मोहमम्द सिराज, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या तिघांनीही या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केली. यानंतर एकीकडे तिघांवर कौतुकाचा वर्षाव होत असताना दुसरीकडे हसन राजाने आयसीसी किंवा अम्पायर्स भारतीय संघाला नवीन चेंडू देत आहेत का? याची पाहणी झाली पाहिजे अशी मागणीच केली आहे.
"आम्हाला समजत नाही आहे की, हे फलंदाज इतर संघांविरोधात चांगले खेळतात. पण जेव्हा भारतीय संघातील मोहम्मद शमी, सिराज गोलंदाजी करतात तेव्हा ते दक्षिण आफ्रिकेच्या अॅलन डोनाल्ड आणि मखाया यांच्यासारखे वाटतात. तेव्हा चेंडूच्या एका बाजूला चमक असायची आणि चेंडू स्विंग होत असे. पण आता तर प्रत्येक डावानंतर चेंडू बदलतात असं वाटत आहे. आयससी, अम्पायर्स, थर्ड अम्पायर किंवा बीसीसीआय हे चेंडू देत असेल तर त्याची पाहणी झाली पाहिजे," असं हसन राजा म्हणाला.
Narh is this for real? He realises everyone picks from the same box of balls after the toss hahaha if this isn’t satire i think there needs to be a full investigation into his mental health. https://t.co/U5JsfipEZZ
— Mitchell McClenaghan (@Mitch_Savage) November 3, 2023
यानंतर मिशेल जॉन मैक्ग्लाशनने एक्सवर पोस्ट केली आहे की, "हे खरं आहे का? टॉस झाल्यानंतर प्रत्येकजण त्यात बॉक्समधून बॉल उललतो हे त्याला माहिती नाही का? जर ही मस्करी नसेल तर त्याचं मानसिक आरोग्य तपासण्याची गरज आहे".
भारताने वानखेडे मैदानात श्रीलंकेचा पराभव करत वर्ल्डकपमधील आपल्या सलग सातव्या विजयाची नोंद केली आहे. श्रीलंकेने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर भारताने 357 धावांचा डोंगर उभा केला. शुभमन, विराट आणि श्रेयसने तुफान फटकेबाजी केली. तिघांचंही शतक थोडक्यात हुकलं.
दरम्यान भारताने श्रीलंकेला फक्त 55 धावांत गारद केलं. मोहम्मद शमीने 5 तर सिराजने 3 विकेटस घेतले. भारताने 302 धावांनी हा सामना जिंकला.