K L Rahul | लखनऊचा कॅप्टन केएल राहुलचा धमाका, मुंबई विरुद्ध शानदार शतक

K L Rahul Century | केएल राहुलने आयपीएल कारकिर्दीतील 100 व्या सामन्यात शानदार शतक ठोकलंय.  

Updated: Apr 16, 2022, 05:42 PM IST
K L Rahul | लखनऊचा कॅप्टन केएल राहुलचा धमाका, मुंबई विरुद्ध शानदार शतक  title=

मुंबई : लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) कर्णधार केएल राहुलने (K L Rahul) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध शानदार शतक ठोकलंय.  विशेष म्हणजे केएलने आयपीएलच्या 100 व्या सामन्यात शतक झळकावलं. केएलने हे शतक अवघ्या 56 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं.  केएलच्या आयपीएल कारकिर्दीतील तिसरं शतक ठरलं. तसेच केएल या मोसमात शतक ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला. (mi vs lsg ipl 2022 lucknow captain k l rahul spectacular century)

केएलला शतक पूर्ण करण्यासाठी 3 धावांची गरज होती. तेव्हा केएलने चौकार ठोकत शतक पूर्ण केलं. केएल या शतकी खेळीत 9 चौकार आणि 5 गगनचुंबी सिक्स मारले. दरम्यान केएल या मोसमात शतक ठोकणारा दुसराच फलंदाज ठरला. याआधी या मोसमात जॉस बटलरने पहिल्यांदा शतक ठोकण्याचा मान पटकावला होता. विशेष म्हणजे बटलरनेही मुंबई विरुद्धच हा शतकी धमाका केला होता.

मुंबईला 200 धावांचे आव्हान 

केएलने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर लखनऊने मुंबईला विजयासाठी 200 धावांचे मजबूत आव्हान दिले आहे. लखनऊने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 199 धावा केल्या. 

लखनऊकडून कॅप्टन केएलने  60 बॉलमध्ये 9 फोर आणि 5 सिक्ससह सर्वाधिक नाबाद 103 धावांची खेळी केली. तर  मनीष पांडेने 38 आणि क्विंटन डी कॉकने 24 धावांचं योगदान दिलं.

मुंबईचे गोलंदाज आजही अपयशी ठरले. मुंबईच्या गोलंदाजांना लखनऊच्या फलंदाजाना रोखण्यात अपयश आलं. मुंबईकडून जयदेव उनाडकटने 2 विकेट्स घेतल्या. तर मुर्गन अश्विन आणि फॅबिएन एलेनने प्रत्येकी 1 विकेट घेतली. 

मुंबई प्लेइंग इलेव्हन:  रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, किरोन पोलार्ड, फॅबियन एलन, जयदेव उनादकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह आणि टाइमल मिल्स.

लखनऊ प्लेइंग इलेव्हन:  केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मनीष पांडे, दीपक हुड्डा,मार्कस स्टोइनिस, आयुष बदोनी, जेसन होल्डर, क्रुणाल पांड्या, दुष्मंथा चमीरा, आवेश खान आणि रवि बिश्नोई.