इथेही फेल तिथेही फेल! पुजारामागचं ग्रहण काही सुटेना

द्रविडचा वारसदार टीम इंडियानंतर आता इथेही अपयशी, पुजाराची क्रिकेट कारकिर्द धोक्यात?

Updated: Apr 16, 2022, 04:26 PM IST
इथेही फेल तिथेही फेल! पुजारामागचं ग्रहण काही सुटेना  title=

मुंबई : टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू चेतेश्वर पुजाराच्या मागचं ग्रहण काही केल्या संपेना. आधी टीम इंडियामध्ये वाईट फॉर्ममुळे बाहेर बसावं लागलं. तर आयपीएलमध्येही काही संधी मिळेना. आता देशाबाहेर खेळायला गेलेल्या पुजारामागे शुक्लकाष्ठ लागलं आहे. 

पहिलं टीम इंडियामधून बाहेर करण्यात आलं. त्यानंतर रणजीमध्ये चांगली कामगिरी करण्याची अट ठेवण्यात आली. मात्र कुठेच त्याच्या बॅटमधून धावा निघत नसल्याने त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी होती ती देखील गमवली आहे. 

काउंटी क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये 15 बॉलमध्ये केवळ 6 धावा करण्यात पुजाराला यश मिळालं आहे. पुजाराच्या वाईट खेळीचा फटका टीमला बसला. त्याला तिथेही म्हणावं तेवढं यश मिळालं नाही. 

दक्षिण आफ्रिका विरुद्ध सीरिजमध्ये पुजाराला टीम इंडियातून खेळण्याची संधी मिळाली नाही. आता त्याच्या काउंटी क्रिकेटमधील खराब कामगिरीमुळे टीममधून बाहेर बसवण्यात आलं आहे. त्याच्या जागी मोहम्मद रिजवानला खेळण्याची संधी देण्यात आली. 

मोहम्मद रिजवान डर्बीशायर विरुद्ध ससेक्ससाठी डेब्यू करणार आहे. पुजाराने आपल्या हाताने ही संधी घालवली आहे. टीम इंडियाचे दरवाजेही बंद झाले आहेत. त्यामुळे पुजारा आता संन्यास घेण्याबाबत विचार करणार का? अशीही एक चर्चा सुरू झाली आहे.