Mumbai Indians Fans Fight Video : रोहित शर्माला नारळ देऊन मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने गुजरातकडून खरेदी केलेल्या हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) पलटणचा कॅप्टन बनवलं. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे फॅन्स नाराज झाले आहेत. प्रतिभावान रोहितकडून (Rohit Sharma) कॅप्टन्सी काढून घेणं आणि फक्त आयपीएलसाठी धडपड करणाऱ्या पांड्याला संघाची जबाबदारी देणं हे कितपत योग्य आहे? असा सवाल विचारला जात आहे. अशातच आता आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात पांड्याला प्रेक्षकांच्या रागाला सामोरं जावं लागलं. तर दुसरीकडे वन फॅमिली म्हटल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्येच हाणामारी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.
हार्दिक पांड्याच्या चाहत्यांनी अहमदाबादच्या मैदानावर लाईव्ह सामन्यात रोहित शर्माच्या चाहत्यांना शिवीगाळ केल्याने दोन्ही चाहत्यांमध्ये राडा झाला. त्यावेळी तुंबळ हाणामारी झाल्याचं देखील समोर आलं आहे. हार्दिकला ट्रोल केल्यानंतर चाहत्याचा पारा चढला अन् त्याने रोहितच्या फॅनला शिवागाळ केली. त्यानंतर रोहितच्या इतर फॅन्सने पांड्याच्या फॅनला चोप दिला. मात्र, अखेर इतर प्रेक्षकांनी प्रकरण मिटवलं. या भांडणाचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
पाहा VIDEO
Fight Between #ONEFAMILY
Hardik Pandya fans abused Rohit Sharma fans and they were fighting yesterday.
One bad decision of Mumbai Indians managment completely broken Mumbai Indians team and divided fans in parts. pic.twitter.com/ycXLTCnlNc— Satya Prakash (@Satya_Prakash08) March 25, 2024
प्रेक्षकांना पांड्याला डिवचलं
टॉसच्या वेळी बोलताना हार्दिक पांड्याने (Harनdik Pandya) गुजरातच्या चाहत्यांचे आभार मानले. मात्र, टॉसवेळी हार्दिक पांड्याला प्रेक्षकांच्या नाराजीला सामोरं जावं लागलं. रवी शास्त्री यांनी हार्दिक पांड्याचं नाव घेताच प्रेक्षकांनी पांड्याला डिवचलं. तर सामन्यावेळी पांड्याच्या बॉलिंगवेळी देखील चाहत्यांनी रोष व्यक्त केला होता. त्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पहिल्याच सामन्यात पांड्याची दादागिरी?
हार्दिक पांड्या मुंबईचा कर्णधार बनताच रोहित शर्माला अयोग्य वागणूक देण्यास सुरुवात केली. सामन्यादरम्यानचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये हार्दिक मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माला फिल्डींगच्या वेळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत पळवताना दिसतोय. मात्र, हार्दिक कॅप्टन असल्याने रोहित शर्माने देखील त्याचा हुकूम ऐकला अन् लॉग ऑनला फिल्डिंगला गेला.
अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्यात गुजरातने मुंबई इंडियन्सला पाणी पाजलं आहे. त्यामुळे आता गेल्या 11 वर्षांची पराभवाची परंपरा कायम राखली आहे. मुंबईने 2013 नंतर एकदाही पहिला आयपीएलचा सामना जिंकला नाही. गुजरातने 169 धावांचं आव्हान पलटणला दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना अखेरच्या ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सला 19 धावांची गरज होती. 20 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) सिक्स अन् दुसऱ्या बॉलवर फोर मारला, पण तिसऱ्या बॉलवर पांड्या आऊट झाला. त्यानंतर चौथ्या बॉलवर पियुष चावला बाद झाल्यावर मुंबई ढेपाळली अन् गुजरातने 6 धावांनी विजय मिळवला.