IND vs AUS: कंट्रोल लाबुशेन कंट्रोल! विकेट गमावल्यानंतर डोळे पुसत पव्हेलियनमध्ये परतला Marnus Labuschagne, पाहा व्हिडीओ

कांगारू फलंदाज मार्नस लाबुशेनची (Marnus Labuschagne) विकेट गेल्यावर रोहित शर्मा अधिकच आनंदी दिसून आला, दरम्यान त्याचा हा आनंद पाहून लाबुशेन मात्र संतापलेला दिसला. 

Updated: Feb 17, 2023, 03:59 PM IST
IND vs AUS: कंट्रोल लाबुशेन कंट्रोल! विकेट गमावल्यानंतर डोळे पुसत पव्हेलियनमध्ये परतला Marnus Labuschagne, पाहा व्हिडीओ  title=

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यामध्ये दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये दुसरा टेस्ट सामना खेळवला जातोय. पहिल्या टेस्ट प्रमाणेच भारतीय गोलंदाजांनी या सामन्यांमध्येही उत्तम गोलंदाजी केली. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर त्यांचा दबाव पहायला मिळाला. सतत पडणारे विकेट्ट पाहून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील खूश होता. कांगारू फलंदाज मार्नस लाबुशेनची (Marnus Labuschagne) विकेट गेल्यावर रोहित शर्मा अधिकच आनंदी दिसून आला, दरम्यान त्याचा हा आनंद पाहून लाबुशेन मात्र संतापलेला दिसला. 

लाबुशनेची विकेट गेल्यावर Rohit Sharma झाला आनंदी

मार्नस लाबुशेन ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा असा फलंदाज आहे, जो विरोधी टीमला अडचणी आणू शकतो. मात्र गिल्ली टेस्ट पहिल्या सामन्यात लाबुशनेची बॅट साजेसा खेळ करू शकली नाही. रविचंद्रन अश्विनने लाबुशेनला अवघ्या 18 रन्सवर माघारी धाडलं. इतकी महत्त्वाची विकेट पटकावल्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या आनंदाला पारावार उरला नाही. 

एकीकडे रोहित शर्मा खूश असताना दुसरीकडे मात्र लाबुशेन आऊट ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यामध्ये मात्र शांतता पसरली. यावेळी विकेट गेल्यानंतर डग आऊटमध्ये परतत असताना लाबुशेन स्वतःच्या इमोशनवर कंट्रोल ठेऊ शकला नाही. यावेळी रागाच्या भरात त्याने जमीनीवर जोरात बॅट आपली आणि पाणावलेल्या डोळे पुसत पव्हेलियनमध्ये परतला. यावेळी पव्हेलियनमध्ये परतत असताना तो काहीतरी बडबडत असल्याचं कॅमेरात कैद झालं आहे. 

Ravindra Jadeja चा नवा विक्रम

रविंद्र जडेजा 250 कसोटी बळी आणि 2500 कसोटी धावा करणारा सर्वात वेगवान भारतीय आणि जागतिक क्रिकेटमधील दुसरा सर्वात वेगवान खेळाडू ठरला आहे. रविंद्र जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये 250 विकेट घेणारा 8वा भारतीय गोलंदाज ठरला. त्याने 62 व्या सामन्यात ही कामगिरी केली.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग 11

डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मारनस लाबुस्चगने, स्टीवन स्मिथ, ट्रॅविस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स केरी, पॅट कमिंस (कर्णधाकर), टॉड मर्फी, नॅथन लियोन, मॅथ्यू कुह्नमॅन.

टीम इंडिया प्लेइंग 11 

रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भरत, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.