MS Dhoni Car Collection: धोनीच्या गाड्यांचं कलेक्शन पाहिलंत का? तुमचेही डोळे चक्रावतील; नवा Video समोर

Mahendra singh dhoni car and bike collection:  धोनीकडे कोट्यवधी रुपयांच्या बाईक्सचं मोठं कलेक्शन आहे. त्याचा व्हिडीओ आता व्यंकटेश प्रसाद याने शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान ट्रेंडिगमध्ये (Viral Video) असल्याचं दिसतंय.

Updated: Jul 18, 2023, 11:57 AM IST
MS Dhoni Car Collection: धोनीच्या गाड्यांचं कलेक्शन पाहिलंत का? तुमचेही डोळे चक्रावतील; नवा Video समोर title=
MS Dhoni car and bike collection

MS Dhoni Venkatesh Prasad: टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) याने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या (Mahendra singh dhoni) रांची येथील निवासस्थानी हजेरी लावली. दोघांच्या चांगल्या गप्पा रंगल्या. त्यानंतर धोनीने खास गोष्ट प्रसादला दाखवली. ते म्हणजे त्याचं बाईक कलेक्शन (Bike Collection). धोनीकडे कोट्यवधी रुपयांच्या बाईक्सचं मोठं कलेक्शन आहे. त्याचा व्हिडीओ आता व्यंकटेश प्रसाद याने शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान ट्रेंडिगमध्ये असल्याचं दिसतंय.

मी एका व्यक्तीमध्ये पाहिलेली सर्वात विलक्षण आवड आहे. काय भारी कलेक्शन आहे आणि काय माणूस आहे हा. एक महान कर्तृत्ववान आणि आणखी अविश्वसनीय व्यक्ती. त्याच्या रांचीतील घरातील बाईक आणि कारच्या कलेक्शनची ही झलक. फक्त माणूस आणि त्याच्या उत्कटतेने भरलेला, असं व्यंकटेश प्रसाद याने ट्विट करत म्हटलं आहे. त्यावेळी त्याने एक व्हिडीओ शेअर केला. तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं दिसत आहे.

पाहा Video

धोनीची बाइक आणि कारची आवड पाहून व्यंकटेश प्रसाद थक्क झाला. जणू काही धोनीचं घर शोरूमसारखा दिसतंय. व्यंकटेश प्रसाद याने मायक्रो-ब्लॉगिंग साईट ट्विटवर शेअर केलेल्या 109 सेकंदांच्या क्लिपमध्ये तुम्ही धोनीचं कलेक्शन पाहू शकता. 

दरम्यान, धोनीकडे 50 पेक्षा जास्त बाइक आहेत, ज्यात Harley-Davidson Fat Boy, Kawasaki Ninja H2, Ducati 1098, Yamaha RD350 आणि Suzuki Hayabusa यांचा समावेश आहे. मला गाड्यांचं जरा वेड आहे. बाइक्स तक्रार करत नाहीत. तुम्ही त्यांना व्यवस्थित ठेवत नाही, तुम्ही त्यांना स्वच्छ करत नाही, तरीही चालतंय, असं धोनी एका मुलाखतीत म्हटला होता.