चॅम्पियन्स ट्रॉफी : न्यूझीलंडचे बांगलादेशसमोर २६६ धावाचे आव्हान

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप ए मधील न्यूझीलंड आणि बांगलादेशच्या सामन्यात रॉस टेलर आणि कर्णधार केन्स विल्यम्स यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने बांगलादेशसमोर २६६ धावांचे आव्हान ठेवले आहे. 

Updated: Jun 9, 2017, 08:03 PM IST
  चॅम्पियन्स ट्रॉफी :  न्यूझीलंडचे बांगलादेशसमोर २६६ धावाचे आव्हान title=

 लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप ए मधील न्यूझीलंड आणि बांगलादेशच्या सामन्यात रॉस टेलर आणि कर्णधार केन्स विल्यम्स यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने बांगलादेशसमोर २६६ धावांचे आव्हान ठेवले आहे. 
 
 न्यूझीलंडकडून रॉस टेलरने सर्वाधिक ६३ धावा काढल्या. त्याने ८२ चेंडूचा सामना करत ६ चौकार लगावत न्यूझीलंडला आश्वासक धावसंख्येपर्यंत पोचवले. त्याला केन विल्यम्स यांना ६९ चेंडूत ५७ धावांची खेळी करून चांगली साथ दिली. 
 
बांगलादेशकडून मोसादीक हुसैन याने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. त्यानंतर तस्कीन अहमद २ आणि मुस्तफिजुर आणि रुबेल हुसैन याने प्रत्येकी एक विकेट घेतली. 

न्यूझीलंड सुरूवातीला मोठ्या धावसंख्येकडे अग्रेसर होता. पण अखेरच्या सात षटकात झटपट विकेट गेल्याने न्यूझीलंडला ५० षटकात २६५ धावाच बनवता आल्या.