FIFA World Cup Final : 'फायनलसाठी तो फिट नाही'; Lionel Messi च्या दुखापतीबाबत धक्कादायक माहिती समोर

अर्जेंटीनाच्या चाहत्यांनी नजर ही कर्णधार लिओनेल मेस्सीवर (Lionel Messi) असणार आहे. मात्र फायनल सामन्याच्या एक दिवस आधीच एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मेस्सी फायनलच्या सामन्यासाठी फीट नसल्याचं समोर आहे.

Updated: Dec 17, 2022, 03:43 PM IST
FIFA World Cup Final : 'फायनलसाठी तो फिट नाही'; Lionel Messi च्या दुखापतीबाबत धक्कादायक माहिती समोर title=

FIFA World Cup Final : फिफा वर्ल्डकपचा फायनल (FIFA World Cup) सामना रविवारी खेळला जाणार आहे. 18 डिसेंबर रोजी भारतीय वेळेनुसार, रात्री 8.30 वाजता अर्जेंटीना विरूद्ध फ्रान्स (Argentina vs France) यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे. अर्जेंटीनाच्या चाहत्यांनी नजर ही कर्णधार लिओनेल मेस्सीवर (Lionel Messi) असणार आहे. मात्र फायनल सामन्याच्या एक दिवस आधीच एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. 

नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, अर्जेंटींनाचा स्टार फुटबॉलपटू आणि कर्णधार लियोनेल मेस्सी फायनल सामन्यासाठी फीट नाहीये. वर्ल्डकपच्या फायनल सामन्यापूर्वी झालेल्या ट्रेनिंग सेशनमध्ये मेस्सीने सहभाग घेतला नव्हता. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो ट्रेनिंग सेशनमध्ये नव्हता. त्यामुळे आता लिओनेल मेस्सी जवळपास फायनल सामना खेळणार नसल्याची चिन्ह दिसतायत.

मेस्सीला नेमकं काय झालंय?

क्रोएशियाविरोधातील सामन्यातच मेस्सी (lionel messi) हॅमस्ट्रिंगमुळे काहीसा अडचणीत असल्याचं पाहायला मिळालं. त्यातच गुरुवारी संपूर्ण टीम सराव करत असताना मेस्सी मात्र त्यात कुठेच दिसला नाही. त्यामुळं तो हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळं त्रस्त असल्याचं उघड झालं. त्याचवेळी चाहत्यांच्या मनात फायनसाठी मेस्सी मैदानात उतरणार की नाही याबाबत प्रश्न होतं.

मेस्सीकडे इतिहास रचण्याची संधी

जगातील सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या लियोनेल मेस्सीकडे आपल्या टीमला चॅम्पियन बनवण्याची मोठी संधी आहे. मुख्य म्हणजे, मेस्सीसाठी ही लिओनेल मेस्सीचा हा शेवटचा वर्ल्डकप आहे. त्यामुळे अर्जेंटीनासाठी त्याचा हा शेवटचा सामना असू शकतो.

अर्जेंटींनाच्या टीमने आतापर्यंत सहावेळा वर्ल्डकपची फायनल गाठली आहे. तर दोन वेळा या टीमने वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं आहे. 1978 आणि 1986 या दोन वर्षी अर्जेंटीनाच्या टीमने वर्ल्डकप जिंकला होता. फान्सच्या टीमची गोष्ट असेल तर या टीमने देखील आतापर्यंत दोन वेळा वर्ल्डकप जिंकला आहे. ज्यामध्ये 1998 आणि 2018 या वर्षांचा सामवेश आहे. दोन्ही टीम त्यांच्या तिसऱ्या खिताबासाठी लढणार आहे. 

अर्जेंटीनाचा फायनलपर्यंतचा प्रवास

साखळी फेरीत प्रत्येक संघाला तीन सामने खेळायचे होते. अर्जेंटिनाचा पहिला सामना सौदी अरेबिया विरुद्ध झाला. या सामन्यात बलाढ्य अर्जेंटिनाला 2-1 ने पराभव सहन करावा लागला. या निकालामुळे मेस्सीचं स्वप्न भंगणार असंच क्रीडाप्रेमींना वाटत होतं. मात्र त्यानंतर मेस्सीच्या संघानं जोरदार कमबॅक केलं. दुसऱ्या सामन्यात मेक्सिकोचा 2-0 ने पराभव केला. त्यानंतर साखळी फेरीतील तिसऱ्या सामन्यात पोलंडला 2-0 मात देत सुपर 16 बाद फेरीत स्थान मिळवलं.

सुपर 16 फेरीत ऑस्ट्रेलियाला 2-1 ने धुळ चारली आणि उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड विरुद्ध अर्जेंटिना यांच्या अतितटीचा सामना रंगला. दोन्ही संघांनी 90 मिनिटं आणि एक्स्ट्रा टाईममध्ये 2-2 ने बरोबरी साधली. त्यानंतर निकाल पेनल्टी शूटआउटमध्ये गेला. हा सामना अर्जेंटिनाने 3-4 ने जिंकला.