धोनीबद्दलचं ते वक्तव्य... कुलदीप यादवचा मीडियावर संताप

भारताचा स्पिनर कुलदीप यादवने काही दिवसांपूर्वी धोनीबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता.

Updated: May 16, 2019, 09:35 PM IST
धोनीबद्दलचं ते वक्तव्य... कुलदीप यादवचा मीडियावर संताप title=

मुंबई : भारताचा स्पिनर कुलदीप यादवने काही दिवसांपूर्वी धोनीबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. धोनी आम्हाला सल्ले देतो, पण बहुतेकवेळा त्याचे सल्ले चुकतात. त्याचा सल्ला चुकला तरी आम्ही त्याला काही बोलू शकत नाही. मॅच सुरु असताना धोनी फार काही बोलत नाही, पण जर त्याला वाटलं तर तो ओव्हरच्या मध्ये येऊन सल्ला देतो,' असं कुलदीप म्हणाला होता.

या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना कुलदीप यादवने मीडियावर निशाणा साधला. मस्करीमध्ये मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. माझं वक्तव्य वाढवून दाखवण्यात आलं, अशी प्रतिक्रिया कुलदीपने दिली.

'कोणतंही कारण नसताना मीडियाने अफवा पसरवून वाद निर्माण केला. या सगळ्या बातम्यांवर मला स्पष्टीकरण द्यायचं आहे. ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. मी कोणाबद्दलही अनुचित बोललेलो नाही. माही भाईचा मी सन्मान करतो,' अशी इन्स्टाग्राम पोस्ट कुलदीपने शेअर केली.

कुलदीप यादव हा वर्ल्ड कपसाठी निवड झालेल्या टीम इंडियाचा सदस्य आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये कुलदीप यादवची कामगिरी निराशाजनक झाली. कोलकात्याकडून खेळताना कुलदीपने ९ मॅचमध्ये फक्त ४ विकेट घेतल्या.

एमएस धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७ सालचा टी-२० वर्ल्ड कप आणि २०११ सालचा ५० ओव्हरचा वर्ल्ड कप जिंकला. धोनी कर्णधार असताना भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही विजय मिळवला. आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने ८ वेळा फायनल गाठली, यातल्या ३ वेळा त्यांचा विजय झाला.