के एल राहुल मोडणार राहुल द्रविडचा सर्वात मोठा रेकॉर्ड? वर्ल्डकपच्या फायनलमध्येच शेवटची संधी

KL Rahul Record: रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात ही लढत होत आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 18, 2023, 11:51 AM IST
के एल राहुल मोडणार राहुल द्रविडचा सर्वात मोठा रेकॉर्ड? वर्ल्डकपच्या फायनलमध्येच शेवटची संधी title=
kl rahul to break rahul dravid record of most dismissals in single world cup 2023

Dismissals In World Cup: 19 नोव्हेंबर हा क्रिक्रेटच्या इतिहासातील सुपर संडे ठरणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये विश्व चषक 2023चा अंतिम सामना रंगणार आहे. जगभरातील क्रिकेटच्या चाहत्यांचे लक्ष रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यावर आहेत. भारताने सामना जिंकल्यानंतर तब्बल 12 वर्षांनी देशात विश्कचषकाचा कप येणार आहे. ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी टिम इंडिया कठोर मेहनत करत आहे. त्याचबरोबर या अंतिम सामन्यात भारताचा विकेटकिपर आणि फलंदाज के.एल राहुल नवा विक्रम रचण्याच्या तयारीत आहे. टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि सध्याचा कोच राहुल द्रविड याचा मोठा रेकॉर्ड तोडण्याचा फक्त एक पाऊल दूर आहे. 

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि विकेटकीपर राहुल द्रविडच्या नावे एका विशेष रेकॉर्डची नोंद आहे. राहुल द्रविडने एकाच विश्वचषकात विकेटकिपिंग करताना सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. गेल्या 20 वर्षांपासून हा रेकॉर्ड राहुल द्रविडच्या नावे आहे. राहुल द्रविडने 2003च्या विश्वचषकात एकूण 16 विकेट घेतल्या होत्या. यामध्ये कॅच आणि स्टंपिंग या दोन्हींचा समावेश आहे. तर, सध्याच्या विश्वचषकात राहुल द्रविडच्या या विक्रमाची बरोबरी के.एल राहुलने केली आहे. के.एल राहुलने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत 16 बळी घेतले आहेत. यामुळे फायनलमध्ये त्याने जर फक्त एक कॅच किवा स्टम्पिंग घेतली तर तो राहुल द्रविडचा रेकॉर्ड मोडेल.

रविवारी होणाऱ्या सामन्यात आणखी एक विकेट घेताच के. एल राहुल नवीन विक्रम रचणार आहे.  एका विश्वचषकात विकेटमागे सर्वाधिक बळी घेणारा भारतातील विकेटकीपर बनणार आहे.  एकाच वनडे विश्वचषकात विकेटकिपर म्हणून सर्वाधिक बाद करण्याचा विश्वविक्रम पाहिला तर हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू अॅडम गिलख्रिस्टच्या नावावर आहे. 2003 च्या विश्वचषकात त्याने एकूण 21 विकेट घेतल्या होत्या. या यादीत टॉम लॅथम (2019 विश्वचषक) 21 बळींसह दुसऱ्या स्थानावर आहे.

टीम इंडियाचा विकेटकिपर आणि फलंदाज केएल राहुल अंतिम सामन्यात टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि सध्याचा हेड कोच असलेल्या राहुल द्रविडचा एक मोठा रेकॉर्ड तोडण्याच्या एक फक्त पाऊल दूर आहे. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात केएल राहुल स्वतःच्या नावावर एक नवा विक्रम रचेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात येणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ही लढत होणार असून विश्वचषकात आत्तापर्यंत झालेल्या सामन्यात भारताचा विजय झाला आहे. त्यामुळं चाहत्यांच्या टिम इंडियाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.