टीम इंडियासाठी 'बॅडलक' ठरलाय हा अम्पायर, नेमका वर्ल्ड कप फायनलवेळी असेल मैदानात

World Cup 2023 Final Umpire: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यासाठी असलेल्या अम्पायर्सकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण फायनलसाठी असलेले अम्पायर हे टिम इंडियासाठी 'बॅडलक' ठरले आहेत.

Pravin Dabholkar | Updated: Nov 18, 2023, 11:12 AM IST
टीम इंडियासाठी 'बॅडलक' ठरलाय हा अम्पायर, नेमका वर्ल्ड कप फायनलवेळी असेल मैदानात title=

World Cup 2023 Final: आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात उद्या भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने सामने असणार आहेत. अंतिम सामन्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. खेळपट्टीपासून सुरक्षेपर्यंतची जोरदार तयारी सुरु आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विराट कोहली, शुभमन गिल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह सारखे जबरदस्त फॉर्मात असलेले खेळाडू 2003 विश्वचषक पराभवाचा बदला घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. दरम्यान या मॅचसाठी असलेल्या अम्पायर्सकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण फायनलसाठी असलेले अम्पायर हे टिम इंडियासाठी 'बॅडलक' ठरले आहेत.
 
इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ आणि रिचर्ड कॅटलबरो हे रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक फायनलमध्ये मैदानावर अम्पायर म्हणून काम पाहणार आहेत. रिचर्ड कॅटलबरो यांनी 2015 च्या विश्वचषक फायनलमध्ये देखील अम्पायर म्हणून काम केले होते. यावेळी त्यांची दुसरी संधी आहे. त्यावेळी दुसरे पंच कुमार धर्मसेना त्यांच्यासोबत होते. यजमान देश 2011 मध्ये आपल्या भूमीवर जिंकलेल्या विजेतेपदाची पुनरावृत्ती करू इच्छितो. रिचर्ड इलिंगवर्थ यांची ही दुसरी विश्वचषक फायनल असेल. पण प्रथमच ते सामना अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत. 1992 च्या विश्वचषकात ते खेळाडू म्हणून खेळले होते.

या दिग्गज खेळाडूवर अंतिम फेरीत पंच म्हणून जबाबदारी 

विश्वचषक अंतिम फेरीसाठी तिसरे पंच म्हणून त्रिनिदाद आणि टोबॅगोचे जोएल विल्सन, चौथे पंच म्हणून न्यूझीलंडचे ख्रिस गॅफनी आणि झिम्बाब्वेचे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट हे अन्य अधिकारी असतील. हे सर्वजण उपांत्य फेरीचे अम्पायर होते. या आठवड्याच्या उपांत्य फेरीत इलिंगवर्थ आणि केटलबरो हे मैदानावरील अम्पायर होते. मुंबईत न्यूझीलंडवर भारताचा विजय आणि केटलबरो, कोलकाता येथे ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयावेळी इलिंगवर्थ उपस्थित होते.

टीम इंडियासाठी ठरला 'बॅडलक'

रिचर्ड केटलब्रो हे अम्पायर म्हणून टीम इंडियासाठी 'बॅडलक' ठरले आहेत. रिचर्ड केटलब्रो यांनी आयसीसी ट्रॉफीच्या बहुतांश बाद फेरीत अम्पायर म्हणून काम केले आहे. जेव्हा जेव्हा केटलब्रोने आयसीसी ट्रॉफीच्या बहुतेक बाद सामन्यांमध्ये भूमिका बजावली तेव्हा भारताला अनेक मोठ्या सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. 

2014  टी20 वर्ल्ड कप फायनल, 2015 विश्वचषक उपांत्य फेरी, 2016 टी20 वर्ल्ड उपांत्य फेरी आणि 2021 विश्व कसोटी चॅम्पियनशिप फायनलमध्ये, रिचर्ड केटलब्रो अम्पायर म्हणून होते. या मोठ्या सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला.