केरळ : केरळच्या क्रिकेट मैदानातून एक दु:खद बातमी आली आहे. क्रिकेट खेळताना भर मैदानात ह्रदयाचा झटका येऊन युवा खेळाडूचा मृत्यू झाला आहे.
केरळच्या कसारागोडमध्ये लोकल आंडर आर्म क्रिकेट टूर्नामेंट सुरू होती. तेव्हा बॉलर रनअप घेत अम्पायरच्या जवळ आला आणि जमिनीवर कोसळला.
अम्पायर आणि इतर खेळाडूंनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. पण तो उठू शकला नाही.
दरम्यान तिथेच त्याचा मृत्यू झाला. ह्रदयाचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
'न्यूज ९' कडे या घटनेचा व्हिडिओ आहे. त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
२०१५ मध्ये कोलकाता येथे ही अशा प्रकारची घटना घडली होती. त्यामध्येही खेळाडूचा मृत्यू झाला होता.
स्थानिक मॅच दरम्यान बंगाल क्रिकेटर अंकित केसरीची दुसऱ्या खेळाडूसोबत टक्कर झाली. दुर्घटनेनंतर त्याला हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले होते.
त्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले होते.