प्रसिद्ध दिग्दर्शक Karan Johar कोट्यावधी संपत्तीचा मालक, आकडा एकूण थक्क व्हालं

आलिशान घर, महागड्या गाड्या, इतक्या कोटीच्या संपत्तीचा मालक आहे करण जोहर? आकडा एकूण थक्क व्हालं

Updated: Aug 28, 2022, 06:53 PM IST
 प्रसिद्ध दिग्दर्शक Karan Johar कोट्यावधी संपत्तीचा मालक, आकडा एकूण थक्क व्हालं  title=

मुंबई : करण जोहर (Karan Johar) हे बॉलिवूडमधलं खूप लोकप्रिय नाव आहे. एक उत्तम चित्रपट दिग्दर्शक असण्यासोबतच करण चित्रपटांचा निर्माता देखील आहे. त्याने हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक उत्तमोत्तम सिनेमे दिले आहे. त्याचे चित्रपट देखील महागडे असतात. मात्र महागडे चित्रपट बनवणारा करण जोहर नेमका किती कोटीच्या संपत्तीचा मालक आहे? ते जाणून घेऊय़ात.  

मुंबईत आलिशान घर 
करण जोहर  (Karan Johar) मुंबईतील कार्टर रोडवरील त्याच्या आलिशान घरात राहतो. त्याच्या घरात एकापेक्षा एक लक्झरी वस्तू आहेत. करणने हे आलिशान घर 2010 मध्ये 32 कोटी रुपयांना खरेदी केले होते. यासोबतच त्यांचे मलबार हिल्समध्ये एक आलिशान घर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्या घराची किंमत 20 कोटी रुपये आहे.

लक्झरी कारचा शौकिन 
करण जोहरला  (Karan Johar) लक्झरी कारची देखील आवड आहे. त्याच्याकडे BMW 745, BMW 760, Mercedes S Class सारख्या उत्तम गाड्या आहेत. एका रिपोर्टनुसार, करण जोहरकडे 7 ते 8 कोटी रुपयांच्या आलिशान गाड्या आहेत.

संपत्ती किती?
करण जोहर  (Karan Johar) धर्मा प्रॉडक्शनचा मालक आहे. तो त्याच्या प्रत्येक चित्रपटातून मोठी कमाई करतो. यासोबतच तो त्याचा मित्र शाहरुख खानच्या प्रोडक्शन हाऊससारख्या इतर प्रोडक्शन हाऊसमध्येही पैसे गुंतवतो. यासोबतच तो शो होस्टिंगच्या माध्यमातून मोठी रक्कमही घेतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, करण जोहरची एकूण संपत्ती 1500 कोटी रुपये आहे.

करण जोहर सध्या त्याच्या 'कॉफी विथ करण' शोच्या सातव्या सीझनमध्ये व्यस्त आहे. या शोचे अनेक शो डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम केले गेले आहेत. या शोची प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते.