Rishabh Pant : 'मी ऋषभच्या कानाखाली जाळ काढेन...', अन् Kapil Dev यांचा पारा चढला!

IND vs AUS Test Series : संघाप्रती तुमची काहीतरी जबाबदारी आहे. अशा प्रकारचा निष्काळजीपणा न करता स्वतःची काळजी घ्या, असा सल्ला कपील देव (Kapil Dev Advice to Youngster) यांनी युवा खेळाडूंना दिलाय.

Updated: Feb 8, 2023, 03:58 PM IST
Rishabh Pant : 'मी ऋषभच्या कानाखाली जाळ काढेन...', अन् Kapil Dev यांचा पारा चढला! title=
Kapil Dev,Rishabh Pant

Kapil Dev On Rishabh Pant : नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोशिएशनच्या (Nagpur Test)  मैदानावर भारत - ऑस्ट्रलिया (IND vs AUS) या दोन संघात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या मालिकेतील (Border-Gavaskar Trophy 2023) पहिला सामना खेळवला जाणार आहे. मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघ भरपूर तयारी करताना दिसत आहेत. दोन्ही संघाच्या रणनीती तयार होत आहे. अशातच आता 1983 साली भारताला पहिल्यांदा वर्ल्ड कप (World Cup 1983) जिंकवून देणाऱ्या कपील देव (Kapil Dev) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद उभा राहिला आहे.

काय म्हणाले Kapil Dev ?

ऑस्ट्रेलियाच्या कसोटी सिरीजमध्ये ऋषभ पंतची (Rishabh Pant) अनुपस्थिती टीम इंडियासाठी मोठी हानी आहे. ऋषभ पंत लवकर बरा व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि जेव्हा तो बरा होईल तेव्हा मी जाऊन त्याच्या कानाखाली जाळ काढेल (I want to slap him), कारण त्याच्या दुखापतीने संपूर्ण संघाचे नियोजन खराब झाले आहे. मग असा संतापही येतो की आजकालची तरुण मुलं अशा चुका का करतात?, असा खडा सवाल त्यांनी तरुणांना विचारला आहे.

रिषभ कसोटी सामन्यांमध्ये (Rishabh Pant Test) झटपट धावा करतो. त्याचा खेळ हा कसोटी क्रिकेटसाठी देखील पूरक आहे. तो नसल्याने त्याची उणीव नक्कीच टीम इंडियाला भासेल. मी देवाकडे प्रार्थना करतो की रिषभ पंत लवकर बरा होऊ दे, असंही कपील देव (Kapil Dev On Rishabh Pant) यावेळी म्हणाले आहेत.

आणखी वाचा -  IND vs AUS, 1st Test: काय खोटं बोलला Harbhajan Singh? खरं तर म्हणतोय "भारताला मालिका जिंकायची असेल तर..."

दरम्यान, संघाप्रती तुमची काहीतरी जबाबदारी आहे. अशा प्रकारचा निष्काळजीपणा (rishabh pant accident) न करता स्वतःची काळजी घ्या, असा सल्ला कपील देव (Kapil Dev Advice to Youngster) यांनी युवा खेळाडूंना दिलाय. तरुण वयात काही छंद असतात, याची जाणीव आहे. मात्र, तुम्ही ड्रायव्हर ठेऊ शकता, असा सल्ला देखील कपील देव यांनी यावेळी दिलाय.