Virat Kohli वरही चढला 'पठाण' गाण्याचा फीव्हर; शाहरुखची हुक स्टेप केली कॉपी

विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी शाहरुख खानच्या नवीन सिनेमा 'पठाण' मधील "झूमे जो पठाण" या गाण्याचे हुक स्टेप केल्याचा व्हिडिओ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नागपूर टेस्ट सामन्यादरम्यान सोशल मीडियावर समोर आला आहे.

Updated: Feb 12, 2023, 06:23 PM IST
Virat Kohli वरही चढला 'पठाण' गाण्याचा फीव्हर; शाहरुखची हुक स्टेप केली कॉपी title=

Virat Kohli Pathan dance : नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border–Gavaskar Trophy) पहिल्या सामन्यात टीम इंडियाने (Team India Beat Australi) ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. 5 दिवसांच्या या टेस्ट सामन्यांचा निर्णय अवघ्या 3 दिवसांत लागला आणि टीम इंडियाने या सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान पहिल्या सामन्यानंतर विराट कोहलीचा (Virat Kohli) एक व्हिडी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी शाहरुख खानच्या नवीन सिनेमा 'पठाण' मधील "झूमे जो पठाण" या गाण्याचे हुक स्टेप केल्याचा व्हिडिओ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नागपूर टेस्ट सामन्यादरम्यान सोशल मीडियावर समोर आला आहे. या दोघांनीही अगदी उत्तम पद्धतीने हे डान्स मूव्ह कॉपी केलेत.

या गाण्यात किंग खान अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत डान्स करताना दिसतो. त्याच पद्धतीने कोहलीने हा डान्य केल्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसतोय.

टेस्टमध्ये विराट कोहली फ्लॉप

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या टेस्ट सामन्यात कोहली त्याच्या बॅटीने काही खास कामगिरी करू शकला नाही. इतकंच नाही तर कोहलीने स्लिपमध्ये कॅच सोडले. विराटने पहिल्या डावात 12 रन्सची खेळी केली होती, तर फिल्डींगदरम्यान त्याने स्टीव्ह स्मिथचा कॅचही सोडला.

टीम इंडियाचा मोठा विजय 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नागपूर कसोटीचा आज तिसरा दिवस होता. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 132 धावांनी पराभव करत 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताने पहिल्या डावात 223 धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा डाव 91 धावातच संपुष्टात आला. 

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केलेल्या कांगारूंचा पहिला डाव 177 धावात संपवला. त्यानंतर आपल्या पहिल्या डावात 400 धावांचा डोंगर उभारत पहिल्या डावात 223 धावांची आघाडी घेतली.  रवींद्र जडेजा, आर अश्विन  यांच्या फिरकीसमोर ऑसी फलंदाज फ्लॉप ठरले. तर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी सुरूच राहिली आणि भारताने अडीच दिवसांत कसोटी जिंकली. भारताने 1 डाव व 132 धावांनी विजय मिळवताना मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.