डेब्यू सामन्यात ईशान किशनचं तुफानी अर्धशतक

ईशानचं आता सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Updated: Mar 15, 2021, 09:29 AM IST
डेब्यू सामन्यात ईशान किशनचं तुफानी अर्धशतक  title=

अहमदाबाद : इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाचा फलंदाज ईशान किशनने रविवारी पदार्पण करत उत्तम खेळी केली. ईशानने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत 28 चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे तो सध्या जोरदार चर्चेत आहे. त्याने 10व्या ओव्हरमध्ये पहिल्या आणि  दुसऱ्या चेंडूत पाठोपाठ सलग 2 षटकार आपल्या नावावर केले. 

महत्त्वाचं म्हणजे क्रिकेट विश्वात पदार्पण करत अर्थशतकी खेळी केली आहे. ईशानने 32 चेंडूत 56 धावांची शानदार अर्धशतकी खेळी साकारली. दुसऱ्या विकेटसाठी त्याने कर्णधार विराट कोहलीसह  94 धावांची भागिदरी केली. 

यासोबतच ईशान टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक गाजवणारा भारतीय  संघातला दुसरा क्रिकेटपटू ठराला आहे.  रोहित शर्माने 2007 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डरबनमध्ये नाबाद 50 रनची खेळी केली. ईशानचं आता सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. शिवाय भारतीय संघातल्या हरभजन सिंग आणि युवराज सिंगने देखली दखल घेतली आहे.