IPL 2023 : विजयी सलामी देणाऱ्या RCB ला मोठा धक्का, मॅच विनर खेळाडू स्पर्धेतून बाहेर

IPL 2023: आयपीएलच्या सोळाव्या हंगामात विजयी सलामी देत आरसीबीने दणक्यात सुरुवात केली आहे. पण दुसऱ्या सामन्याआधीच रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख खेळाडूला या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे. 

Updated: Apr 4, 2023, 06:04 PM IST
IPL 2023 : विजयी सलामी देणाऱ्या RCB ला मोठा धक्का, मॅच विनर खेळाडू स्पर्धेतून बाहेर title=

Royal Challengers Bangalore : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने (Royal Challengers Bangalore) आयपीएलच्या सोळाव्या हंगामाची (IPL 2023) सुरुवातल विजयाने केली आहे. पहिल्याच सामन्यात बंगलोरने मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) दणक्यात पराभव केला. कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) दमदार फलंदाजीच्या जोरावर बंगलोरने मुंबईचा 8 विकेटने पराभव केला. फॉर्मात असलेल्या विराट कोहलीने 82 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. आता बंगलोरचा दुसरा सामना बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सशी (Kolkata Knight Riders) रंगणार आहे. पण त्याआधीच बंगलोरला एक मोठा धक्का बसला आहे. 

आरसीबीला मोठा धक्का
आयपीएल 2021 मध्ये पदार्पण करणारा आरसीबीचा प्रमुख फलंदाज रजत पाटीदार (Rajat Patidar) दुखापतीमुळे इंडियन प्रीमिअर लीगमधून बाहेर पडला आहे. IPL 2022 मध्ये रजत पाटीदारने शानदार कामगिरी केली होती. गेल्या हंगामातत त्याने 8 सामन्यात 55.50 च्या स्ट्राईक रेटने 333 धाव केल्या होत्या. यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. आयपीएलमध्ये त्याचा सर्वोत्तम स्कोर आहे 112 धावा. पण या हंगामाला रजत पाटीदार मुकणार आहे. रजत पाटीदारच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून रॉयल चॅलेंजर्स बंगलोर व्यवस्थापनने याला दुजोरा दिला.

रणजी ट्रॉफीत दमदार कामगिरी
आयपीएलशिवाय रजत पाटीदारने स्थानिक क्रिकेटमध्येही दमदार कामगिरी केली आहे. मध्य प्रदेशकडून खेळताना रजतने रणजी ट्रॉफीत शानदार शतक ठोकलं, या हंगामात त्याने 658 धावा केल्या. आतापर्यंत खेळलेल्या 52 फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये रजतने 3795 धावा केल्या आहेत. यात 11 शतकांचा समावेश आहे. त्याच्या याच कामगिरीच्या जोरावर त्याला टीम इंडियातही संधी मिळाली. यात चार इनिंगमध्ये त्याने 319 धावा केल्या आहेत. 

हेही वाचा : IPL 2023 मध्ये कोरोनाची एन्ट्री, 'हा' दिग्गज पॉझिटीव्ह.... लीग रद्द होणार?

आरसीबीचा संघ
फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, वानिंदु हसारंगा, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, अनुज रावत, आकाश दीप, जोश हेजलवुड, महिपाल लोमरोर, फिन एलन, सुयश प्रभुदेसाई, कर्ण शर्मा, सिद्धार्थ कौल, डेविड विली, रीस टॉप्ली, हिमांशु शर्मा, मनोज भांडगे, राजन कुमार, अविनाश सिंह, सोनू यादव, माइकल ब्रेसवेल.