युजवेंद्र चहल-धनाश्री वर्माचा व्हायरल डान्स पाहून तुम्ही म्हणाल, "क्या बात है"

हार्दिक संधूच्या लोकप्रिय गाण्यावर हे दोघेही नाचत आहेत.

Updated: Oct 6, 2021, 04:55 PM IST
युजवेंद्र चहल-धनाश्री वर्माचा व्हायरल डान्स पाहून तुम्ही म्हणाल, "क्या बात है" title=

मुंबई : धनश्री वर्मा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती अनेकदा तिचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते, जे तिच्या चाहत्यांनाकडून खूप पसंत केले जाते. धनश्री व्यवसायाने डेंटिस्ट आहे, पण तिला डांन्सची आवड असल्याने ती डान्स देखील करते आणि त्याला सोशल मीडियावरती शेअर देखील करते. धनश्रीने आता तिचा लेटेस्ट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये युजवेंद्र चहल देखील तिच्यासोबत दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हार्दिक संधूच्या लोकप्रिय गाण्यावर हे दोघेही नाचत आहेत.

धनश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये, पाहिले जाऊ शकते की धनश्री आणि युजवेंद्र पंजाबी गायक हार्दिक संधूच्या 'क्या बात है' या गाण्यावर  काळ्या रंगाचा ड्रेसमध्ये डान्स करत आहे.

व्हिडीओमध्ये दोघे खूप मस्त नाचत आहेत, दोघेही एकमेकांना शोभून दिसतात. धनश्री तर डान्सर आहेच, परंतु आपला लाडका क्रिकेटच्या डान्सला देखील तोड नाही, त्याने चांगल्या प्रकारे धनश्रीला व्हिडीओमध्ये साथ दिली आहे.

या व्हिडीओवर दोघांच्याही चाहत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. ज्यामुळे या व्हिडीओला 5 तासाच 3.5 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. बहुतेक लोक या व्हिडीओवरती प्रतिक्रिया म्हणून हार्ट आणि Emoji देखील पाठवत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडीओवर कमेंट करताना एका सोशल मीडिया यूजरने लिहिले, 'चहल भाई रॉकस्टार'. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले, 'क्यूट कपल'. तर आणखी वापरकर्ता लिहितो, 'शेवटी पतीचा नंबर आला'. हे लक्षात घेण्यासारखे आहे की गेल्या वर्षी युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. युजवेंद्र चहल हे भारताचे सुप्रसिद्ध क्रिकेटपटू आहेत, तर धनश्री दंतचिकित्सक तसेच प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आहेत.