ईशान किशन 'या' सुंदरीला करतोय डेट, तिच्याबद्दल जाणून वाटेल आश्चर्य

इशान किशन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, तो त्याच्या लव्ह लाईफमुळे.

Updated: Apr 22, 2022, 04:58 PM IST
ईशान किशन 'या' सुंदरीला करतोय डेट, तिच्याबद्दल जाणून वाटेल आश्चर्य  title=

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज इशान किशन (IPL 2022 इशान किशन) याने आपल्या जबरदस्त बॅटिंग स्किल्सने लोकांना वेड लावलं आहे. त्याने अगदी काही वर्षांत क्रिकेट जगतात मोठे स्थान मिळवले आहे. ज्यामुळे इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मधील सर्वात महागडा खेळाडू ठरला. ज्यामुळे तो सर्वत्र चर्चेचा विषय ठरला. विराट कोहली किंवा आणखी दिग्ग खेळाडू असतानाही इशान किशनसाठी इतकी महाग बोली लावली गेली. म्हणूनच त्याची सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली.

परंतु आता इशान किशन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, तो त्याच्या लव्ह लाईफमुळे.

बिहारचा रहिवासी असलेला ईशान किशन जयपूरची हसीना अदिती हुंडिया हिला डेट करत आहे. सध्या दोघांनीही आपलं नातं अधिकृत केलं नाही. परंतु अनेकदा त्यांना भेटताना पाहिलं गेलं आहे.

मिस सुपरनेशनल

अदिती आणि ईशान एकमेकांच्या सोशल मीडियावर कमेंट देखील करत असतात. त्याचबरोबर अदिती अनेकदा ती मॅचमध्ये असल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ज्यामुळे तिला क्रिकेट आणि क्रिकेटरमध्ये किती इन्ट्रेस्ट आहे, हे दिसून येतं.

ईशान आणि अदिती चे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. आदितीबद्दल बोलायचे झाले तर ती व्यवसायाने फॅशन मॉडेल आहे. 2017 च्या फेमिना मिस इंडियाची ती फायनलिस्ट होती. त्याचबरोबर 2018 मध्ये मिस सुपरनॅशनल इंडिया ती जिंकली आहे.

सोशल मीडिया पर काफी एक्टिव

अदिती 2016  मध्ये मिस राजस्थान स्पर्धेत फर्स्ट रनर अप ठरली आहे. 2018 मध्ये तिने मिस दिवा पेजेंटचा किताब जिंकला. पोलंडमधील मिस सुपरनॅशनल स्पर्धेतही तिने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

IPL 2019 च्या अंतिम सामन्यादरम्यान अदिती हुंडिया कॅमेरामध्ये कैद झाली होती. एवढेच नाही तर तिने आपल्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील फायनलचा आनंद घेताना ती दिसली. अदितीचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत.