कोरोनाचा आयपीएलला फटका, 14 मार्चला होणार निर्णय

कोरोनामुळे आयपीएलच्या सामन्यांवर सावट 

Updated: Mar 12, 2020, 11:47 AM IST
कोरोनाचा आयपीएलला फटका, 14 मार्चला होणार निर्णय  title=

मुंबई : कोरोना व्हायरसचा देशाला फटका बसत असताना आता क्रिकेटप्रेमींसाठी अत्यंत महत्वाची बातमी. अगदी काही दिवसांत आयपीएल 2020 ला सुरूवात होणार होती. पण आयपीएल होण्यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. आयपीएलशीसंबंधित महत्वाची बैठक शनिवारी होणार आहे. 

आयपीएल गवर्निंग काऊन्सिलने कोरोना व्हायरसच्या सद्यस्थितीमुळे शनिवारी 14 मार्च रोजी महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत आयपीएलबाबच्या आयोजनाबाबत महत्वाचा आणि शेवटचा निर्णय घेतला जाणार आहे. 

आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी याबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ शकेल अशी माहिती दिली होती. बीसीसीआय भारतातील कोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहे. पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता आम्ही सध्याच्या स्थितीची पाहणी करत आहोत त्यावरूनच निर्णय घेतला जाणार आहे. 

आयपीएल 2020 चे सामने 29 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडिअममधून सुरू होणार होते. पहिला सामना हा मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपरकिंग्स असा होता. पण या सामन्याला मुंबईत प्रेक्षक उपस्थित राहणार नाहीत. फक्त प्लेअर्समार्फत हा सामना होईल असं सांगण्यात येत होतं. 

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबईतील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या बघता आयपीएल सामने स्थगित करण्याचा विचार करत असल्याच सांगितलं. 

तसेच परदेशातून येणाऱ्या पर्यटकांना आणि नागरिकांना 15 एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे. कोरोना व्हायरसमुळे परदेशी विमान सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे परदेशी खेळाडू देखील भारतात येण्याची शक्यता कमी आहे. अशावेळी आयपीएलचे सामने कसे भरवले जातील? हा मोठा प्रश्नच आहे.