IPL 2018: पाहा कोण ठरला सर्वात महागडा खेळाडू आणि कोण Unsold

आयपीएल २०१८ म्हणजेच अकराव्या सीजनसाठी लिलाव सुरु झाला आहे. एक नजर टाकूयात लिलावातील सर्वात महागड्या खेळाडूंवर तसेच कुठल्या खेळाडूला कुणी खरेदी केलं...

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 27, 2018, 10:11 PM IST
IPL 2018: पाहा कोण ठरला सर्वात महागडा खेळाडू आणि कोण Unsold title=
Image: www.iplt20.com

मुंबई : आयपीएल २०१८ म्हणजेच अकराव्या सीजनसाठी लिलाव सुरु झाला आहे. यंदाच्या लिलावात एकूण ५७८ खेळाडूंच्या नावाचा समावेश आहे. ज्यामध्ये ३६० भारतीय तर इतर परदेशी प्लेअर्स आहेत. एक नजर टाकूयात लिलावातील सर्वात महागड्या खेळाडूंवर तसेच कुठल्या खेळाडूला कुणी खरेदी केलं...

चेन्नई सुपर किंग्स (CSK)

किंग्ज इलेव्हन पंजाबने फाफ डू प्लेसिसला १ कोटी ६० लाख रुपयांत खरेदी केलं. मात्र, चेन्नईने राईट टू मॅच कार्डचा वापर करत प्लेसिसला पुन्हा आपल्या टीममध्ये घेतलं. हरभजन सिंगला चेन्नईच्या टीमने २ कोटी रुपयांत खरेदी केलं. किंग्स इलेव्हन पंजाबने ड्वेन ब्रावोला ६ कोटी ४० लाखांत खरेदी केलं मात्र, CSK ने पुन्हा एकदा राईट टू कार्डचा उपयोग करत त्याला टीममध्ये पुन्हा घेतलं.

शेन वॉट्सनला चेन्नई सुपर किंग्स (CSK)ने ४ कोटी रुपयांत खरेदी केलं. केदार जाधवला खरेदी करण्यासाठी ७ कोटी ८० लाख रुपये खर्च केले. तर, अंबाती रायडूला ६ कोटी २० लाखांत खरेदी केलं.

दिल्ली डेअरडेविल्स (DD)

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज बॅट्समन ग्लेन मॅक्सवेल याला दिल्लीच्या टीमने ९ कोटी रुपयांत खरेदी केलं. गौतम गंभीरला २ कोटी ८० लाखांत खरेदी केलं. 

किंग्स इलेव्हन पंजाब (KXIP)

किंग्स इलेव्हन पंजाबने ७ कोटी ६० लाख रुपयांत आर अश्विनला खरेदी केलं. प्रिती झिंटाने युवराज सिंगला २ कोटी रुपयांत खरेदी केलं. करुण नायरला ५ कोटी, लोकेश राहुलला ११ कोटी रुपयांत खरेदी केलं. ऑस्ट्रेलियाचा ओपनर अॅरोन फिंच याला ६ कोटी २० लाखांत खरेदी केलं.

कोलकाता नाईट राइडर्स (KKR)

कोलकाताच्या टीमने ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल स्टार्कला ९.४० कोटी रुपयांत खरेदी केलं. ऑस्ट्रेलियाच्या क्रिस लिनला KKR ने ९ कोटी ६० रुपयांत खरेदी केलं. तर, दिनेश कार्तिकला ७ कोटी ४० लाख, रॉबिन उथप्पा ६ कोटी ४० लाख रुपयांत खरेदी केलं.

मुंबई इंडियंस (MI)

किरोन पोलार्ड याला दिल्ली डेअरडेविल्सने ५ कोटी ४० लाखांत खरेदी केलं होतं. मात्र, MIने राईट टू मॅच कार्डच्या माध्यमातून पुन्हा आपल्या टीममध्ये घेतलं. बांगलादेशचा फास्ट बॉलर मुस्ताफिजुर रहमान याला MIने ५ कोटी ४० लाखांत खरेदी केलं. 

राजस्थान रॉयल्स (RR)

राजस्थान रॉयल्सच्या टीमने इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक्स याला १२ कोटी ५० लाखांत खरेदी केलं. पंजाबने अंजिक्य रहाणेला ४ कोटी रुपयांत खरेदी केलं होतं. मात्र, राजस्थानच्या टीमने राईट टू मॅचच्या माध्यमातून पुन्हा आपल्या टीममध्ये घेतलं.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB)

RCB ने न्यूझीलंडचा माजी कॅप्टन बँडन मॅक्युलम याला ३ कोटी ६० लाखांत खरेदी केलं. तर, इंग्लंडचा ऑल राऊंडर क्रिस वोक्सला ७ कोटी ४० लाखांत खरेदी केलं.

सनराइजर्स हैदराबाद (SRH)

सनराइजर्स हैदराबादने राइट टू मॅच कार्डचा वापर करत शिखर धवनला पुन्हा आपल्या टीममध्ये घेतलं आहे. त्याला पंजाबच्या टीमने ५ कोटी २० लाखांत खरेदी केलं होतं. मनीष पांडे याला SRHने ११ कोटी रुपयांत आपल्या टीममध्ये घेतलं. 

पहिल्या दिवशी या खेळाडूंवर बोली लागली नाही

जेम्‍स फॉकनर, जोश हेजलवुड, मिचेल जॉनसन, मुरली विजय, क्रिस गेल, जॉनी बैरेस्‍टो, हाशिम अमला, जो रूट, पार्थिव पटेल, सैम बिलिंग्‍स, टिम साउदी, मिचेल मैक्‍लेन्‍घन, लसिथ मलिंगा, मार्टिन गप्‍टिल, नमन ओझा, ईशांत शर्मा, ईश सोढ़ी