तो येतोय! आयपीएलमध्ये हार्दिक पांड्यासाठी पहिली खुशखबर, टी20 स्पेशलिस्ट संघात परतणार

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी आतापर्यंत कोणतीच चांगली गोष्ट घडलेली नाही. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला सलग तीन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. पॉईटटेबलमध्येही मुंबई तळाला आहे. 

राजीव कासले | Updated: Apr 3, 2024, 09:04 PM IST
तो येतोय! आयपीएलमध्ये हार्दिक पांड्यासाठी पहिली खुशखबर, टी20 स्पेशलिस्ट संघात परतणार title=

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या सतराव्या हंगाम मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) सुरुवात निराशाजनक झाली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जागी आलेल्या नवा कर्णधार हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला सलग तीन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. सनराजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएलमधल्या सर्वाधिक धावसंख्येची नोंद केली. तर राजस्थान रॉयल्सने मुंबईला त्यांच्या होम ग्राऊंडवर धुळ चारली. पॉईंटटेबलमध्येही मुंबई सर्वात तळाला म्हणजे दहाव्या क्रमांकाव आहे. यामुळे हार्दिकच्या कर्णधारपदावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलंय. 

हार्दिक पांड्यासाठी पहिली खुशखबर
मुंबई इंडियन्ससाठी सर्वकाही बिघडलं असतानाच कर्णधार हार्दिक पांड्यासाठी आयपीएलमधून पहिली खुशखबर समोर आली आहे. दुखापतीमुळे बाहेर असलेला टी20 स्पेशलिस्ट सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) तंदरुस्त झाला आहे. आणि लवकरच तो मुंबई इंडियन्स संघात परतणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने सूर्यकुमार यादव पूर्णपणे तंदरुस्त झाल्याचं जाहीर केलं आहे. स्पोर्ट हार्नियावरच्या शस्त्रक्रियानंतर सूर्यकुमार यादव राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली होता. 

सूर्यकुमार यादवची आयपीएलमधली कामगिरी
सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. सूर्यकुमार यादवने 139 सामन्यात तब्बल 3249 धावा केल्या आहेत. यात त्याने एक शतक आणि तब्बल 21 अर्धशतकं केली आहेत. 103 ही त्याची आयपीएलमधली सर्वोत्तम धावसंख्या आहे. सूर्यकुमारच्या समावेशामुळे मुंबई इंडियन्सची फलंदाजी आणखी मजबूत होणार आहे. 

नमन धीरला संधी
सूर्यकुमार यादवच्या गैरहजेरीत मुंबई इंडियन्समध्ये पंजाबचा आक्रमक फलंदाज नमन धीरलला संधी देण्यात आली आहे. डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या नमनने पहिल्या तीन सामन्यात फारशी समाधान कारक कामगिरी केलेली नाही. तीन सामन्यात नमनने 50 धावा केल्यात.  सूर्यकुमारची संघात एन्ट्री झाल्यास नमन धीरची सुट्टी होण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्सचा तिसरा सामना 7 एप्रिलला होम ग्राऊंड मुंबईत होणार आहे. मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सशी दोन हात करेल,

मुंबई इंडियन्सचा संघ
हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, तिलक वर्मा, टिम डेविड, विष्णु विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहाल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, ल्यूक वुड, रोमारियो शेफर्ड, गेराल्ड कोएत्जी, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा, क्वेना मफाका.