IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा म्होरक्या, 'या' खेळाडूंना टाटा गुड बाय!

Mumbai Indians released players list : मुंबई इंडन्सने इंडियन प्रीमियर लीग (IPL2024) च्या हंगामापूर्वी त्यांच्या कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे, जोफ्रा आर्चर राखून ठेवलेल्या खेळाडूंच्या यादीचा भाग असणार नाही.    

सौरभ तळेकर | Updated: Nov 27, 2023, 12:35 AM IST
IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा म्होरक्या, 'या' खेळाडूंना टाटा गुड बाय! title=
IPL 2024, Rohit Sharma, Mumbai Indians

Mumbai Indians, IPL 2024 : मुंबई इंडन्सने इंडियन प्रीमियर लीग (IPL2024) च्या हंगामापूर्वी त्यांच्या कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे, जोफ्रा आर्चर (Jofra Archer) राखून ठेवलेल्या खेळाडूंच्या यादीचा भाग असणार नाही. तर ईशान किशन, तिलक वर्मा, पियुष चावला, आकाश मधवाल,जेसन बेहरनडॉर्फ आणि कॅमेरून ग्रीन या खेळाडूंवर रोहित शर्माने (Rohit Sharma) विश्वास ठेवला आहे. त्यामुळे आता मुंबईसाठी यंदाची आयपीएल रोमांचक असेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबई इंडियन्सने कायम केलेले खेळाडू: 

रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, तिलक वर्मा, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, शम्स मुलानी, पियुष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरनडॉर्फ, कॅमेरून ग्रीन, डेवाल्ड ब्रेविस, टीम डेव्हिड व रोमारियो शेफर्ड (ट्रेड)

मुंबई इंडियन्सने करारमुक्त केलेले खेळाडू: 

जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स, रायली मेरेडिथ, झाय रिचर्डसन, ख्रिस जॉर्डन, डुआन जेन्सन, अर्शद खान, रमनदिप सिंग, ऋतिक शौकीन, राघव जुयाल, संदीप वॉरियर.

हार्दिकला मुंबईत 'नो एन्ट्री'

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, तो गुजरातकडूनच खेळेल, अशी माहिती स्टार स्पोर्टच्या हवाल्याने समोर आली आहे. 

आणखी वाचा - मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सकडूनच खेळणार

आयपीएल 2024 च्या लिलावाच्या आधी मुंबई इंडियन्स संघात एक मोठा बदल झाला आहे. मुंबई संघाने लखनऊ सुपर जायंट्सच्या रोमारिओ शेफर्ड याला ट्रेड करून संघात घेतले आहे. शेफर्ड हा वेस्ट इंडिजचा ऑलराउंडर असून त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत ४ मॅच खेळल्या आहेत. आयपीएल 2023 मध्ये शेफर्डने फक्त एक मॅच खेळली होती.

दरम्यान, 22 नोव्हेंबर रोजी राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात ट्रेड झाला. यामध्ये राजस्थान रॉयल्सने त्यांचा फलंदाज देवदत्त पडिक्कल (७.७५ कोटी रुपये) आणि लखनऊ सुपर जायंट्सने त्यांचा गोलंदाज आवेश खान (१० कोटी) यांची अदलाबदल केली. तर या आधी 3 नोव्हेंबर रोजी रोमारियो शेफर्ड लखनऊमधून मुंबई इंडियन्समध्ये गेला. तो यापूर्वी लखनऊ सुपर जायंट्स संघाचा भाग होता.