IPL 2024 Pakistan Claim About Mayank Yadav Haris Rauf Connection: इंडियन प्रिमिअर लीगमधील पहिल्या 17 सामन्यानंतर सर्वाधिक चर्चा असलेला खेळाडू आहे, मयांक यादव! आयपीएलमध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीने पहिल्या 3 सामन्यांमध्ये डेल स्टेनपासून ब्रेट लीपर्यंत अनेकांना भूरळ पाडणाऱ्या मयांकबद्दल एका पाकिस्तानी पत्रकाराने मोठा अजब दावा केला आहे. विशेष म्हणजे या दाव्यावरुन आता भारतीयांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
पहिल्या 3 सामन्यांमध्येच आपल्या वेगवान गोलंदाजीने मयांक यादवने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने यंदाच्या आयपीएलमधील सर्वात वेगवान बॉल टाकला आहे. बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सविरुद्धच्या सामन्यात मयांक यादवने 156.7 किलोमीटर प्रती तास वेगाने बॉल टाकला. मयांक यादवने आतापर्यंत 8 ओव्हर्स आयपीएलमध्ये टाकल्या आहेत. त्यामध्ये त्याने 41 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्यात. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत म्हणजेच पर्पल कॅपच्या शर्यतीत मयांक तिसऱ्या स्थानी आहे. याच मयांकला आता पाकिस्तानचा माजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्कल प्रशिक्षण देत असल्याचा दावा पाकिस्तानमधील क्रीडा पत्रकार फरिद खानने केला आहे. मॉर्नी मॉर्कल हा लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाच्या कोचिंग स्टाफपैकी एक आहे. तो टी-20 वर्ल्डकपसाठी मयांकला तयार करत असून पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी विशेष तयारी केली जात असल्याचा दावा फरिद खानने केला आहे.
फरिद खानने मयांक यादवसंदर्भात एक भविष्यवाणी केली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये फरिद खान मयांक अग्रवाल भारतीय संघाकडून टी-20 वर्ल्डकप खेळेल असा दावा केला आहे. इतक्यावरच न थांबता फरिद खानने भारतीय संघ व्यवस्थापनाकडून मयांक यादवला पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हॅरीस रौफच्या गोलंदाजीचे व्हिडीओ दाखवले जात असल्याचाही दावा केला आहे. 9 जून रोजी अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तानविरुद्ध सामन्यासाठी तयारी म्हणून मयांकला पाकिस्तानच्या हॅरीस रौफच्या गोलंदाजीचे व्हिडीओ दाखवले जात असल्याचा दावा फरिदने केला आहे.
नक्की वाचा >> 'तो फारच स्पेशल, कारण..'; आधी टीममध्ये घेऊन पश्चाताप, आता सेल्फीसहीत प्रितीची भावनिक पोस्ट
"मयांक यादव नक्कीच भारताच्या टी-20 वर्ल्ड कप संघात असेल. मला याची खात्री आहे. तुम्ही या पोस्टचा स्क्रीन शॉट काढून ठेवा. भारत त्याला तयार करत असून तो पाकिस्तानविरुद्ध खेळेल. बीसीसीआय आतापासूनच त्याला हॅरीस रौफने मागील टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध केलेल्या गोलंदाजीचे व्हिडीओ दाखवत आहे. पाकिस्तानचा माजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्कल लखनऊच्या संघाबरोबर असून तो त्याला प्रशिक्षण देत आहे," असं फरिदने स्वत:च्या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हटलं आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...
Mayank Yadav will play against Pakistan in T20 World Cup 2024. BCCI is already showing him videos of Haris Rauf
Former Pakistan bowling coach Morne Morkel also working with Mayank in Lucknow, and making plans for Babar Azam & Saim Ayub #tapmad #HojaoADFree #IPL2024 pic.twitter.com/skzUhmxBoQ
— Farid Khan (@_FaridKhan) April 3, 2024
फरिदच्या या अजब दाव्यावरुन अनेकांनी फरिदची आणि हॅरीस रौफची खिल्ली उडवली आहे. गोलंदाजी कशी करुन नये हे समाजावं म्हणून मयांकला रौफचे व्हिडीओ दाखवले जात आहेत, असा टोला एका भारतीय चाहत्याने लगावला आहे. काही व्हायरल ट्वीट्स पाहूयात...
1) कशी बॉलिंग करु नये हे समजण्यासाठी हॅरिस रौफचे व्हिडीओ दाखवतात
"BCCI is already showing him videos of Haris Rauf" Why? To show him how not to bowl? lol
— Me$$! fan B@rca Supporter (@Joshia206) April 3, 2024
2) हा रौफ कोण आहे पण?
Bhai yeh haris rauf rauf kaun hain?
— stock market parody (@AS269146) April 3, 2024
3) रोहितने रौफला धुतल्याचं त्या व्हिडीओत दिसेल
Meanwhile, videos of Haris Rauf be like pic.twitter.com/25kOwbHLBt
— Aditya (@adt007ad_) April 3, 2024
दरम्यान, दुसरीकडे भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीनेही, आपण निवड समितीमध्ये असतो तर नक्कीच मयांकची टी-20 वर्ल्डकपसाठी नक्कीच निवड केली असती असं म्हटलं आहे. जसप्रित बुमराह, मोहम्मद शमीबरोबर मयंक अगदी योग्य गोलंदाज ठरेल, असं मनोज तिवारी म्हणाला.