'धोनी त्याला 'CSK ची कतरिना कैफ' म्हणतो'; पत्नीनेच केला रंजक खुलासा! Video पाहाच

IPL 2024 Katrina Kaif of CSK: मुंबई इंडियन्स विरुद्ध होणाऱ्या चेन्नईच्या आजच्या सामन्यामध्ये या खेळाडूला अंतिम 11 मध्ये संधी दिली जाईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील सामन्यामध्ये त्याला टीममध्ये स्थान मिळालेलं नव्हतं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 14, 2024, 11:38 AM IST
'धोनी त्याला 'CSK ची कतरिना कैफ' म्हणतो'; पत्नीनेच केला रंजक खुलासा! Video पाहाच title=
या खेळाडूच्या पत्नीनेच केला खुलासा

IPL 2024 Katrina Kaif of CSK: चेन्नई सुपर किंग्जच्या संघातील वेगवान गोलंदाज असलेल्या दिपक चहरबद्दल त्याची पत्नी जया चहरने एक विचित्र खुलासा केला आहे. चेन्नईच्या संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा माझ्या पतीला 'चेन्नई सुपर किंग्जची कतरिना कैफ' अशी हाक मारतो, असं जया चहरने म्हटलं आहे. युट्यूबवरील 'कपल ऑफ थिंग्स' नावाच्या पॉडकास्टमध्ये जया आणि दिपक सहभागी झाले होते. हा पॉडकास्ट शो अमृता राव आणि आरजे अनमोल दोघे होस्ट करतात. पतीसमोरच जयाने हा विचित्र नावासंदर्भातील खुलासा केला.

आयपीएलदरम्यान केलं प्रपोज

भारतीय संघातील वेगवान गोलंदाज असलेल्या दिपक चहर 2021 साली चर्चेत आला जेव्हा त्याने आयपीएलच्या पर्वादरम्यानच जयाला प्रपोज केलं होतं. ऑक्टोबर महिन्यात त्याने दुबईतील अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर जयाला प्रपोज करत लग्नासाठी मागणी घेतली. हजारो चाहत्यांसमोर जयाने दिपकला होकार दिला. त्यानंतर काही महिन्यांमध्येच म्हणजेच जून 2022 मध्ये दिपक आणि जया लग्नबंधनात अडकले. आग्रा येथे जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत त्यांचा विवाह पार पडला. या दोघांनी पहिल्यांदाच अशाप्रकारे लग्नानंतर कॅण्डीड इंटरव्ह्यू दिला आहे.

पत्नीनेच केला खुलासा

युट्यूबवरील 'कपल ऑफ थिंग्स' नावाच्या पॉडकास्टमधील एक व्हिडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 31 मार्च रोजी रिलीज झालेल्या या व्हिडीओमध्ये जया दिपकला धोनीसंदर्भातील जोक मी सर्वांना सांगू का? असं विचारताना दिसत आहे. सुरुवातीला दिपक यामध्ये फारसा रस दाखवत नाही. मात्र नंतर पत्नीच्या हट्टावरुन तो तिला काय ते सांगून टाक असं म्हणतो आणि ती धोनीने दिपक चहरला दिलेल्या टोपणनावासंदर्भात खुलासा करते. धोनी दिपक चहरला चेन्नई सुपर किंग्जची कतरिना कैफ म्हणतो असं जयाने सांगितलं. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...

आज मैदानात दिसणार चहर

मागील पर्वामध्ये जखमी असल्याने चांगली कामगिरी न करता आलेल्या दिपकला 2024 च्या पर्वामध्ये समाधानकारक सुरुवात करता आली आहे. त्याने पहिल्या 4 सामन्यांमध्ये 4 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमधील 29 वा सामना आज चेन्नई आणि मुंबई इंडियन्सच्या संघादरम्यान होणार असून या सामन्यात दिपक चहरला अंतिम 11 खेळाडूंमध्ये संधी मिळेल अशी दाट शक्यता आहे.

नक्की वाचा >> ...म्हणून MI vs CSK सामन्याचा टॉसच ठरणार निर्णायक; मुंबईत आज रात्री 4,6 चा पाऊस?

कोलकाता नाईट रायडर्सच्या संघांविरुद्ध झालेल्या चेन्नईच्या शेवटच्या सामन्यात चहरला अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळालेलं नव्हतं. त्याचे स्नायू खेचले गेल्याने त्याला आराम देण्यात आला होता.