लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या आयपीएल २०२४ मधील फलंदाजीकडे बघितलं तर लखनऊच्या स्कॉडमध्ये परदेशी खेळाडूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु एका सामन्यात कोणताही संघ फक्त 4 परदेशी खेळाडूंसहच मैदानात उतरू शकतो. अशा परिस्थितीत असा प्रश्न निर्माण होतो की संघाकडे कर्णधार केएल राहुल व्यतिरिक्त कोणते भारतीय फलंदाज आहेत, जे लखनऊसाठी फलंदाजीची जबाबदारी उचलू शकतील? लखनऊच्या संघात दीपक हुड्डासारखे प्रतिभावान फलंदाज आहेत, पण आयपीएलच्या मागील सिझनमध्ये दीपकचा रंग उडालेला दिसत होता.
दीपक हुड्डाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, मागील सिझन त्याच्यासाठी फारच वाईट गेला होता. त्याने 12 सामन्यांमध्ये केवळ 84 धावाच केल्या होत्या. संघाकडे आयुष बदोनी, प्रेरक मांकड आणि कृणाल पांड्या यांच्यासारखे प्रतिभावान भारतीय खेळाडू उपलब्ध आहेत, परंतु जेव्हा भारतीय फलंदाजांची चर्चा होते तेव्हा लखनऊचा संघ या बाबतीत थोडा मार खात आहे. यादरम्यान, देवदत्त पडिक्कलने राजस्थान रॉयल्ससोबतचा संबंध तोडून एलएसजीमध्ये प्रवेश केला आहे. पण गेल्या हंगामातही त्यांचा कामगिरी फारशी चांगली राहिली नव्हती. पडिकल देखील गेल्या हंगामात ११ सामन्यांमध्ये २६१ धावाच करू शकला होता. तर बघण्यायोग्य गोष्ट असणार असेल की, लखनऊचे धाकड परदेशी फलंदाज टीमला कशा पद्धतीने या परिस्थितीतून सावरू शकणार?
लखनऊच्या संघात क्विंटन डी कॉक, कायल मायर्स, निकोलस पुरन आणि मार्कस स्टॉइनिस यांच्यासारखे जलदगतीने खेळणारे परदेशी फलंदाज आहेत मात्र यांपैकी सर्वांना एकाच सामन्यात खेळवणे जवळपास अशक्य होणार आहे. एकंदरीत पाहिल्यास, या वेळी भारतीय फलंदाजीच लखनऊ सुपर जायंट्ससाठी कमकुवत बाजू ठरण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्याकडे सामना जिंकवण्यासाठी भरोसेमंद भारतीय फलंदाज नाहीये. त्यामुळे आता केएल राहुलचं टेन्शन वाढलंय.
लखनऊ सुपरजायंट्स स्कॉड :
केएल राहुल, क्विंटन डिकॉक, निकोलस पूरन, आयुष बढोनी, दीपक हुड्डा, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, काइल मेयर्स, मार्कस स्टोयनिस, प्रेरक मांकड, युद्धवीर सिंह, मार्क वुड, मयंक यादव, मोहसिन खान, रवि बिश्नोई, यश ठाकुर, अमित मिश्रा, नवीन उल हक, देवदत्त पडिक्कल, अरशद खान, डेविड विली, एश्टन टर्नर, मणिमारन सिद्धार्थ, अर्शीन कुलकर्णी, शिवम मावी.