ऋषभ पंतनंतर श्रीलंकेच्या बड्या खेळाडूचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा झाला

Lahiru Thirimanne's Health Update : श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार लाहिरू थिरिमाने याचा कार अपघात (Lahiru Thirimanne Car Crash) झाला आहे. अनुराधापुरामध्ये प्रवास करत असताना मिनी ट्रकने त्याच्या कारला धडक दिली.

सौरभ तळेकर | Updated: Mar 14, 2024, 05:46 PM IST
ऋषभ पंतनंतर श्रीलंकेच्या बड्या खेळाडूचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा झाला title=
Sri Lankan Cricketer Lahiru Thirimanne hospitalised after car crash

Sri Lanka Captain Lahiru Thirimanne Injured in Car Crash : टीम इंडियाचा सुपरस्टार ऋषभ पंत याचा दीड वर्षांपूर्वी भीषण अपघात झाला होता. आता दुखापतीतून बरा झाल्यानंतर ऋषभ आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. मात्र, ऋषभ पंतनंतर आता आणखी एका खेळाडूचा कार अपघात झाला आहे. श्रीलंकेचा माजी कॅप्टन लाहिरू थिरिमाने (Lahiru Thirimanne) याचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. अनुराधापुरामधील थिरापन्ने येथे लाहिरू थिरिमा याचा अपघात झाला. लाहिरू थिरिमाने प्रवास करत असताना एका मिनी ट्रकने धडक दिली, त्यामुळे लाहिरू थिरिमाने गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले आहेत. लाहिरू थिरिमाने याला (Lahiru Thirimanne's Health Update) त्यानंतर तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

घराच्या दिशेने जात असताना 14 मार्च रोजी त्याचा अपघात झाल्याची माहिती श्रीलंकन मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे. तर सोशल मीडियावर त्याच्या गाडीचे अनेक हादरवणारे फोटो समोर आले आहेत. लाहिरू थिरिमानेच्या गाडीचा अपघात झाल्याची महिती मिळताच लोकांनी गर्दी केली अन् त्याला रुग्णालयात दाखल केलं. अँम्ब्युलन्स बोलवून लाहिरू थिरिमानेला रुग्णालयात न्यावं लागलं. त्यामुळे आता लाहिरू थिरिमाने प्रकृतीबाबत अद्याप माहिती समोर आली नाही.

सकाळी 7:45 च्या सुमारास एका मिनी बसने धडक दिल्याची माहिती श्रीलंकन पोलिसांनी दिली आहे. कार चालक, लाहिरू थिरिमाने आणि आणखी एक व्यक्ती यामध्ये उपस्थित होती, अशी माहिती मिळाली आहे. अपघाताच्या तीन दिवस आधी म्हणजेच 11 मार्च रोजी लाहिरू थिरिमाने याने लीजेंड्स क्रिकेट ट्रॉफीमध्ये धुंवाधार कामगिरी केली होती. त्याने विस्फोटक 90 धावांची खेळी केली होती. न्यूयॉर्क स्ट्राइकर्सकडून खेळताना त्याने आपल्या फलंदाजीची धार दाखवली होती. न्यूयॉर्क स्ट्राइकर्सने लाहिरू थिरिमानेच्या अपघातावर एक स्टेटमेंट जारी केलं आहे. त्यानुसार, लाहिरू थिरिमानेच्या कारमध्ये त्याचं संपूर्ण कुटूंब देखील उपस्थित होतं. मात्र, कोणालाही गंभीर स्वरुपाची दुखापत झाली नाही. 

अपघातानंतर लाहिरू थिरिमानेच्या संपूर्ण कुटूंबाची प्रकृतीची काळजी घेतली जात आहे, असंही न्यूयॉर्क स्ट्राइकर्सकडून सांगण्यात आलंय. तुम्हाला माहिती नसेल तर.. लाहिरू थिरिमाने याने वर्ल्ड कप 2023 च्या पूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर त्याने लीडेंड्स क्रिकेट ट्रॉफी 2024 मध्ये सहभाग नोंदवला होता. भारताविरुद्ध लाहिरू थिरिमाने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.