एमएस धोनीचं तिहेरी शतक, अशी कामगिरी करणारा पहिला विकेटकीपर

IPL 2024 CSK Vs DC, MS Dhoni: चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टी20 क्रिकेटमध्ये एख खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. धोनीच्या नावावर अनोखं तिहेरी शतक जमा झालं आहे. अशी कामगिरी करणारा धोनी हा क्रिकेट जगतातील पहिला विकेटकिपर ठरलाय.

राजीव कासले | Updated: Apr 1, 2024, 05:13 PM IST
एमएस धोनीचं तिहेरी शतक, अशी कामगिरी करणारा पहिला विकेटकीपर title=

MS Dhoni T20 Record In Wicketkeeping : आयपीएलमध्ये रविवारी तेरावा सामना पार पडला. चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स (CSK vs DC) आमने सामने होते. या सामन्यात दिल्लीने चेन्नईवर 20 धावांनी मात केली आणि पहिल्या विजयाची नोंद केली. तर सलग दोन विजयानंतर चेन्नईला तिसऱ्या सामन्यात पराभवाचा धक्का बसला. या सामन्याच चेन्नईला पराभव स्विकारावा लागला असला तरी चेन्नईचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या (MS Dhoni) नावावर एक अनोखा विक्रम जमा झाला आहे. धोनीच्या नावावर तिहेरी शतक जमा झालंय. अशी कामगिरी करणारा धोनी हा क्रिकेट जगतातील पहिला विकेटकिपर ठरलाय.

माही मार रहा है
दिल्ली विरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या आक्रमक फलंदाजीचा जलवाही चाहत्यांना पाहिला मिळाला. धोनीने अवघ्या 16 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाबद 37 धावा केल्या. गेल्या अनेक सामन्यांनंतर धोनीचं जुनं रुप चाहत्यांना पाहिला मिळालं. धोनी फलंदाजीसाठी मैदानावर उतरताच संपूर्ण स्टेडिअमभर त्याच्या नावाचा जयघोष ऐकाला मिळाला. धोनीनेही आपल्या चाहत्यांनी निराश केलं नाही. दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई करत त्याने चौकार-षटकारांची बरसात केली. पण त्याआधी क्षेत्ररक्षण करताना धोनीच्या नावाने एक अनोखआ विक्रम केला.

धोनीचा अनोखा विक्रम
महेंद्रसिंग धोनीने विकेटकिपिंग करताना टी20 क्रिकेटमध्ये मोठा माईलस्टोन गाठलाय. स्टम्पच्या मागे धोनीने 300 विकेट घेण्याची कामगिरी केलीय. टी20 क्रिकेटच्या 367 डावांमध्ये विकेटकिपर म्हणून माहिने 300 फलंदाजांना पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला आहे. 300 विकेटचा टप्पा गाठणारा धोनी हा क्रिकेट जगतातील पहिला विकेटकिपर ठरला आहे. या यादीत पाकिस्तानचा माजी विकेटकिपर कामरान अकमल दुसऱ्या स्थानावर आहे. अकमलने 281 डावात स्टम्पच्या मागे 274 विकेट घेतल्या आहेत. 

सर्वाधिक बाद करणारे विकेटकिपर
एमएस धोनी- 300 (367 डाव)

कमरान अकमल- 274 (281 डाव)

दिनेश कार्तिक- 274 (325 डाव)

क्विंटन डि कॉक- 270 (290 डाव)

जॉस बटलर- 209 (259 डाव)

दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉचा झेल टिपत धोनीने आपला 300 विकेटचा टप्पा पूर्ण केला. दिल्ली कॅपिटल्सने 11 व्या षटकात पृथ्वी शॉची विकेट गमावली. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर धोनीने त्याचा झेल टिपला.

फलंदाजीत धोनीची कमाल
आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत तीन सामने खेळलेत. यात एम एस धोनीला पहिल्यांदा फलंदाजीची संधी मिळाली. या संधीचं धोनीने सोनं केलं. चेन्नई सुपर किंग्सचा माची कर्णधार धोनीने अवघ्या 16 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकार लगावले. धोनीचा स्ट्राईक रेट होता तब्बल  231.25 इतका. धोनी आठव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. चेन्नई सुपर किंग्सला सामना जिंकता आला नाही पण धोनीने आपल्या फलंदाजीनी चाहत्यांची मनं जिंकली.