Virat Kohli: 'म्हणून कर्णधारपद सोडलं...' आयपीएलच्या तोंडावर विराट कोहलीने अचानक केला मोठा खुलासा

Virat Kohli On Captaincy: टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने मोठा खुलासा केला आहे.  आयपीएलमध्ये आरसीबीचं कर्णधारपद सोडण्यामागचं कारण त्याने सांगितलं आहे. पहिल्यांदाच त्याने यावर वक्तव्य केलं आहे. 

Updated: Mar 16, 2023, 06:50 PM IST
Virat Kohli: 'म्हणून कर्णधारपद सोडलं...' आयपीएलच्या तोंडावर विराट कोहलीने अचानक केला मोठा खुलासा title=

Virat Kohli On Quitting RCB captaincy: आयपीएलचा सोळावा हंगाम (IPL 2023) सुरु व्हायला आता काही दिवसांचाच अवधी उरलाय. येत्या 31 मार्चपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार असून तब्बल 52 दिवस म्हणजे 28 मेपर्यंत चाहत्यांना आयपीएलचा धमाका पाहिला मिळणार आहे. पण त्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएल 2021 मध्ये विराट कोहलीने (Virat Kohli)रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचं (Royal Challengers Bangalore) कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याच वर्षी विराटने टीम इंडियाचं (Team India) कर्णधारपदही सोडलं. आता दोन वर्षांनंतर विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याच्या कारणामागचा खुलासा केला आहे. 

विराट कोहलीने केला खुलासा
आरसीबीचं कर्णधारपद का सोडलं याबात बोलताना विराटने सांगितलं, माझा स्वत:वरील विश्वास उडाला होता, कर्णधार म्हणून त्यातली आवडही कमी झाली होती, असं विराटने सांगितलं. कोहलीच्या नेतृत्वात आरसीबी 2017 आणि 2019 च्या हंगामात सर्वात तळाला होती. कोहलीने टीम इंडियाचं कर्णधारपद सोडल्यानंतर 2021 च्या हंगामात आरसीबीच्या कर्णधारपदालाही सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर संघ व्यवस्थापनाने विराटच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसिसवर संघाच्या कर्णधारपदाची धुरा दिली.

आरसीबी महिला संघासा साधला संवाद
विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु महिला संघाशी संवाद साधला. यावेळी त्याने आरसीबीच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळाबद्दलची माहिती दिली. ज्यावेळी माझा कर्णधारपदाचा कार्यकाळ संपत आला होता, तेव्हा खरं सांगायचं तर मला स्वत:वर फारसा विश्वास नव्हता. कर्णधारपद पुन्हा मिळावं याबाबत माझ्या मनात कोणतीही भावना उरली नव्हती. पण 'हा माझा स्वतःचा दृष्टीकोन होता असं विराटने सांगितलं. 

आरसीबीची जेतेपदाची झोळी रिकामीच
आयपीएलचे आतापर्यंत पंधरा हंगाम झाले आहेत. आयपीएलच्या सुरुवातीपासून म्हणजे 2008 पासून रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हा संघ या स्पर्धेत खेळतोय. पण आतापर्यंत एकदाही आरसीबीला जेतेपदाची संधी मिळाली नाही.  पंधरा हंगामात तीन वेळआ आरसीबी प्लेऑफपर्यंत पोहली. पण जेतेपदाने मात्र हुलकावणीच दिली. 

आरसीबीला मोठा धक्का
दरम्यान, आयपीएलचा नवा हंगाम सुरु होण्यापूर्वीच संघाला एक मोठा धक्का बसला आहे. डिसेंबर 2022 मध्ये खेळाडूंच्या लिलावात तब्बल 3.2 कोटींची बोली लावून संघात घेतलेला धडाकेबाज बॅटस्मन विल जॅक्स आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही. दुखापतीमुळए विल जॅक्स संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. विल जॅक्स हा मधल्या फळतील आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. 

आरसीबीचा संघ
विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, फाफ डू प्लेसिस, दिनेश कार्तिक, मोहम्मद सिराज, वानिंदु हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेजलवूड, शाहबाज अहमद, रजत पाटीदार, आकाश दीप, सुयश प्रभुदेसाई, डेविड विली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोर, अनुज रावत, फिन एलेन, सिद्धार्थ कौल, सोनू यादव, हिमांशू शर्मा, मनोज भंडागे, रीस टॉपली, राजन कुमार, अविनाश सिंह