IPL 2023 : आयपीलमधल्या संघांचे आश्चर्यकारक निर्णय, पाहा कोणते खेळाडू झाले रिटेन आणि रिलीज

आयपीएल 2023 साठी दहा संघांच्या खेळाडूंची यादी जाहीर, पाहा क्लिकवर आयपीएलचे सर्व अपडेट्स

Updated: Nov 15, 2022, 08:38 PM IST
IPL 2023 : आयपीलमधल्या संघांचे आश्चर्यकारक निर्णय, पाहा कोणते खेळाडू झाले रिटेन आणि रिलीज title=

IPL 2023 Retention List : टी20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) आता क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे आयपीएलच्या (IPL) सोळाव्या हंगामाकडे. आयपीएल 2023 साठी येत्या मंगळवारी खेळाडूंची अंतिम यादी जारी केली जाणार आहे. आयपीएलमधल्या सर्व 10 संघांनी आपल्या खेळाडूंची यादी तयार केली असून बीसीसीआयला याबाबतची माहिती दिली आहे. रिटेंशननंतर  (Retaintion) लिलावासाठी कोणते खेळाडू उपलब्ध असणार याचं चित्रही आता जवळपास स्पष्ट झालं आहे. 

कोण झालं रिलेट, कोणाची झाली सुट्टी
सनरायझर्स हैदराबातने (Sunrisers Hyderabad) केन विल्यम्सन, नोकलस पूरन, जगदीश सुचिथ, प्रियम गर्ग, रविकुमार समर्थ, रोमारियो शेफर्ड, सौरभ दुबे, शॉन एबॉट, शशांक सिंह, श्रेयस गोपाल, सुशांत मिश्रा, विष्णु विनोद या खेळाडूंना अलविदा केला आहे. लिलावात आता हैदराबादकडे 42.25 कोटी रुपये उपलब्ध आहेत.

मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) तब्बल तेरा खेळाडूंना रिलीज केलं आहे. ज्यात धडाकेबाज फलंदाज कायरन पोलार्डचाही समावेश आहे. मुंबईकडे 20.55 कोटी रुपये असून तीन परदेशी खेळाडूंची जागा रिकामी आहे. मुंबईने कायरन पोलार्डसह, अनमोलप्रीत सिंह, आर्यन जुयाल, बसिल थाम्पी, डॅनिएल सॅम्स, फॅबिएन एलेन, जयदेव उनादकट, मयंक मार्केंडय, मुरुगन अश्विन, राहुल बुद्धि, रिले मेरेडिथ, संजय यादव, टाइमिल मिल्स यांना रिलीज केलं आहे. 

दोन कर्णधारांची सुट्टी
पंजाब किंग्सने (Punjab Kings) मयांक अग्रवालला रिलीज केलं आहे. तर सनराजझर्स हैदराबादने केन विलियम्सनला अलविदा केला आहे. या दोन संघांनी आपल्या कर्णधारालाच बाहेर केलं आहे. आता हे खेळाडू मिनी लिलावासाठी उपलब्ध असतील.

KKR ला मोठा धक्का
कोलकाता नाईट रायडर्समधून (Kolkata Knight Riders) पॅट कमिंस, सॅम बिलिंग्स आणि एलेक्स हेल्स यांनी माघार घेतली आहे. आपल्या देशाकडून खेळण्यासाठी या तिन खेळाडूंनी आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. 2023 मध्ये अॅशेस मालिका (Ashes Series) खेळवली जाणार आहे, तसंच एकदिवसीय वर्ल्ड कपही (ODI World Cup) होणार आहे.

आयपीएलमध्ये 10 संघ
आयपीएल 2023 मध्ये 10 संघांचा समावेश असणार आहे. यासाठी डिसेंबरमध्ये मिनी लिलाव (Mini Auction) पार पडणार आहे. त्याआधी सर्व संघांना आपल्या खेळाडूंची यादी द्यावी लागणार आहे. अनेक संघांनी मोठ्या खेळाडूंना रिलीज (Release) केलं आहे, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

कायरन पोलार्डने घेतला सन्यास
मुंबई इंडियनने कायरन पोलार्डला (Kieron Pollard) रिलीज केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. यानंतर काही वेळातच पोलार्डने मोठा निर्णय घेतला. पोलार्डने आयपीएलमधून सन्यास घेतला असून आयपीएलमधली 13 वर्षांची कारकिर्द संपुष्टात आली आहे.