IPL 2023 मध्ये चुरस वाढली, सर्व संघाना प्लेऑफमध्ये जाण्याची संधी?

IPL 2023 Point Table : आयपीएलचा प्रत्येक सामना रंगतदार होत आहे. दहा संघाला अजूनही प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे. प्रत्येक संघ हा प्लेऑफसाठी तयारी करत असते. मात्र राजस्थानविरुद्ध हैदराबादच्या सामन्यानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे.

श्वेता चव्हाण | Updated: May 8, 2023, 01:08 PM IST
IPL 2023 मध्ये चुरस वाढली, सर्व संघाना प्लेऑफमध्ये जाण्याची संधी? title=
IPL 2023 Playoffs qualification scenarios for all teams

IPL 2023 Point Table : आयपीएलमध्ये (IPL 2023) सर्वात रोमांचक सामन्याचा अनुभव रविवारी (7 मे 2023) जयपूरमध्ये झालेल्या सामन्यात अनुभवयाला मिळाला. राजस्थानला पुन्हा एकदा घरच्या मैदानावर  पराभवाचा सामना करावा लागला आहे. राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद (RR vs SRH) विरुद्धच्या सामन्यातील शेवटच्या चेंडूवर संदीप शर्माच्या एका छोट्या चुकीमुळे एक जिंकलेला सामना हैदराबादच्या हाती गेला. राजस्थान आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत (IPL 2023 Point Table) मोठा बदल झाला आहे.

राजस्थान विरुद्ध हैदराबाद पूर्व राजस्थान गुणतालिकेत चौथ्या स्थानावर होता, मात्र हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतही ते चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे हैदराबादमधील परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. संघ दहाव्या स्थानावर होता पण आता नवव्या स्थानावर पोहोचला आहे. एकंदरीत आयपीएलच्या सामन्यात सर्व संघाना प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आहे. 

आयपीएलचा 16 व्या हंगामात प्रत्येक सामना हा रंगतदार होत आहे. दहा संघाला अजूनही प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे. प्रत्येक संघ हा प्लेऑफसाठी तयारी करत असते. दरम्यान रविवारी झालेल्या पहिल्या  सामन्यात गुजरातने लखनौचा पराभव करून गुणतालिकेत पहिले स्थानी कायम राहिले आहे. तर लखनौच्या पराभवाचा फायदा चेन्नईला झाला आहे. लीग टेबलमध्ये लखनौच्या पुढे चेन्नईने पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. यामुळे गुजरात आणि चेन्नईचे प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित झाले आहे. असे असले तरी आयपीएलमधील सर्व संघांना प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. 

कोणता संघ कितव्या स्थानावर

आयपीएलच्या गुणतालिकेत गुजरात अव्वल स्थानावर कायम आहे. गुजरातने आतापर्यंत 11 पैकी 8 सामने जिंकले असून संघाचे 16 गुण आहेत. चेन्नई 13 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. परिणामी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात आणि धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईला प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची सर्वाधिक शक्यता आहे. गुजरात संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता 91 टक्के आणि चेन्नईची शक्यता 78 टक्के आहे. तर लखनऊ तिसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान चौथ्या आणि आरसीबी 10 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. मुंबईही 10 गुणांसह सहाव्या, तर पंजाब 10 गुणांसह सातव्या आणि कोलकाता आठव्या क्रमांकावर आहे. हैदराबाद नवव्या स्थानावर तर दिल्ली 8 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.

टॉप 4 मध्ये कोणते संघ

गुजरात टायटन्सने लखनऊचा पराभव करून गुणतालिकेत पहिले स्थान कायम ठेवले. गुजरात संघ सुरुवातीपासूनच टॉप 4 मध्ये आहे. गुजरात, चेन्नई, लखनौ, राजस्थान सध्या टॉप 4 लीगमध्ये आहेत, परंतु त्यांच्या व्यतिरिक्त इतर सर्व लीगमध्ये जास्तीत जास्त सामने जिंकणे आणि नेट रन रेट सुधारणे आवश्यक आहे.