KKR vs PBKS Playing 11 : आयपीएलच्या 2023 (IPL 2023) 53 व्या सामन्यात आज कोलकाता आणि पंजाब किंग्ज (KKR vs PBK) आमनेसामने येणार आहेत. प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी दोन्ही संघासाठी विजय महत्त्वाचा आहे. यामुळे दोन्ही संघासाठी आजचा सामना अतिशय रोमांचक होण्याची शक्यता आहे. कोलकातामधील ईडन गार्डन्सवर हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होईल. या मैदानावर होणारा हा सहावा सामना असेल. पंजाब किंग्जचा संघ 10 सामन्यांत 10 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. तर कोलकाता 10 सामन्यांतून 8 गुणांसह आठव्या स्थानावर आहेत. परिणामी पंजाब 2 गुण मिळवण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक आहे. तर कोलकातासाठी आजचा सामना करो किंवा मरो सारखा असणार आहे.
आयपीएल 2023 मधील पंजाब आणि कोलकाता (KKR vs PBK) दोन्ही संघाची ही दुसरी लढत आहे. याआधी 1 एप्रिल रोजी त्यांच्यात खेळला गेलेला पहिला सामना पंजाबच्या नावावर होता, जो त्यांनी डकवर्थ-लुईस नियमानुसार जिंकला होता. पंजाबने शेवटचा सामना जिंकला असला तरी आयपीएलमध्ये कोलकाताचा विक्रम त्यांच्याविरुद्ध चांगला आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत दोघांमध्ये 31 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये कोलकाताने 20 सामने जिंकले आहेत तर पंजाबने 11 सामने जिंकले आहेत. आता या दोघांमधील 32 वा सामना कोण जिंकतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कोलकाता आणि पंजाब किंग्ज यांच्यातील हा सामना ईडन गार्डन्सच्या मैदानावर खेळला जाईल. आजची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाऊ शकते. या स्टेडियमच्या लहान आकारामुळे मोठी धावसंख्या पाहायला मिळते. तसेच या स्टेडियमवर दव महत्त्वाची भूमिका असून दव पडल्यानंतर फिरकी गोलंदाजांना या खेळपट्टीवर मदत मिळू शकते. त्यानंतर धावा काढणे थोडे कठीण होऊ शकते. येथील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 155 आहे. या मैदानावर आतापर्यंत पाच सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने चार वेळा विजय मिळवला आहे. गेल्या वेळी येथे गुजरात टायटन्स आणि केकेआरचा सामना झाला होता. गुजरातने हा सामना 7 गडी राखून जिंकला होता.
सोमवारी कोलकातामध्ये पावसाची शक्यता कमी आहे. दिवसाचे कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहील. म्हणजे आजच्या सामन्यात पावसाची शक्यता नाही. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 31 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये केकेआरचा वरचष्मा दिसत आहे. केकेआरने 20 तर पंजाबने 11 सामने जिंकले आहेत. मात्र, यावेळी विजय कोणाच्या हाती येईल, हे काही सांगता येत नाही.
कोलकाता नाईट रायडर्स : रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
पंजाब किंग्स : प्रभसिमरन सिंग, शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम कुरन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, राहुल चहर, अर्शदीप सिंग.