IPL 2023 : आयपीएल, अर्थात इंडियन प्रीमियर लीग. पहिल्या पर्वापासूनच क्रिकेटप्रेमींचा उत्साह ओसंडून पाहतो आणि आणि त्यांचं कुतूहल परमोच्च शिखर गाठतं अशी ही स्पर्धा. भारतासारख्या देशात, जिथं क्रिकेट (Cricket) या खेळाला अनन्यसाधारण महत्त्वं दिलं जातं त्याच देशात आयपीएल म्हणजे आता एक ब्रँडच तयार झाला आहे. IPL मुळं बऱ्याच स्थानिक खेळाडूंनाही आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. इतकंच नव्हे, तर या खेळाडूंच्या खेळामुळं Team India ची निवड करणाऱ्या निवड समितीलाही अनेक खेळाडूंचे पर्याय मिळाले.
समालोचक म्हणू नका किंवा मग विश्लेषक. इथं असणारा प्रत्येकजण क्रिकेटबद्दल बोलतानाच नकळतच प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतो. अगदी मैदानावर खेळाडूसुद्धा त्यांच्या परीनं खेळाचा आनंद घेत प्रेक्षकांची मनंही जिंकताना दिसतात. अशा या आयपीएलमध्ये चर्चेत असणारा आणखी एक विषय म्हणजे तिथं असणाऱ्या चिअरलीडर्स (Cheerleaders).
खेळाडू कोणताही असो, त्यात त्या संघाच्या चिअरलीडर्स आपल्या संघाच्या खेळाडूंनी चौकार, षटकार, शतक, अर्धशतक झळकावले की हातात झिरमिळ्या असणारे Props घेऊन तिथं मैदानातच येणाऱ्या लहानशा व्यासपीठावर येतात आणि काही सेकंदांसाठी का असेना कमाल Dance सादर करताना दिसतात. अनेकदा तर, खेळाडूंपेक्षा या चिअरलीडर्सच भाव खाऊन जातात.
तुम्हाला माहितीये का, याच IPL मध्ये एका आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या क्रिकेटपटूची बहिणसुद्धा cheerleader होती. ती (Chennai Super Kings) चेन्नई सुपरकिंग्स या संघाची चिअरलीडर होती. तो खेळाडू म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू आणि जागतिक स्तरावर अष्टपैलू खेळाडू अशी ओळख असणारा जॅक कॅलिस (Jacques Kallis).
जॅक कॅलिस 2009 च्या आयपीएलदरम्यानच चर्चेचा विषय ठरला, जेव्हा त्याची बहीण इथं चिअरलीडर आहे ही बाब प्रकाशझोतात आली होती. त्या वर्षी जेनी चिअरलीडर म्हणून आयपीएलमध्ये दिसली होती. 'मी आवड म्हणून हे काम करते. माझ्याविषयी कोण काय विचार करतं याच्याशी मला काहीच फरक पडत नाही', असं ती एका मुलाखतीदरम्यान म्हणाली होती.
जाणून आश्चर्य वाटेल, पण जेनी एक फिजियोथेरपिस्ट असून, ती London मध्ये राहते. ती सध्या चिअरलीडर नाही, हा तिच्या आयुष्यातील भूतकाळ झाला. सध्या जेनी विवाहित असून, एका मुलीची आई आहे.
आयपीएलच्या (IPL) या झगमगाटात चर्चेत असणाऱ्या आणि सर्वांच्या नजरा वळवणाऱ्या या चिअरलीडर्सना चांगलं मानधन मिळतं असं म्हणतात. हे मानधन प्रत्येक संघाच्या अनुषंगानं वेगळं असतं. काही संघ एका दिवसासाठी 15 हजार किंवा त्याहून अधिक रुपये एका चिअरलीडरला देतात. तर, काही संघांकडून प्रत्येत चिअरलीडरला एका दिवसाचे 25 हजार रुपयेही दिले जातात अशी माहिती सूत्रांमार्फत मिळते.