IPL 2023: ज्याची भीती होती तेच घडलं; CSK च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी!

Indian Premier League 2023 : बेन स्टोक्स आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यात (IPL 2023 First match) फक्त फलंदाज म्हणून खेळण्याची शक्यता आहे. स्टोक्सच्या डाव्या गुडघ्यात दुखापत (Ben Stokes has injection in knee) झाल्याची माहिती समोर आली आहे.

Updated: Mar 28, 2023, 06:51 PM IST
IPL 2023: ज्याची भीती होती तेच घडलं; CSK च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी! title=
IPL 2023 CSK Dhoni

Chennai Super Kings, Ben Stokes: येत्या दोन दिवसानंतर आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सुरूवात होणार आहे. डिफेंन्डिंग चॅम्पियन गुजरात टायटन्स (GT) आणि थाला धोनीच्या चेन्नईमध्ये (CSK) सलामीचा सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे कधी एकदा टीव्ही सुरू करून आयपीएलची (IPL 2023) धून ऐकायला मिळते, याची वाट सर्व क्रिकेटचाहते पाहत आहेत. अशातच पहिल्या सामन्याला दोन दिवस शिल्लक असताना आता CSK च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे.

पहिल्यांदाच चेन्नईच्या ताफ्यात सामील झालेला इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) याच्याबद्दल वाईट बातमी आली आहे. बेन स्टोक्स आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यात (IPL 2023 First match) फक्त फलंदाज म्हणून खेळण्याची शक्यता आहे. स्टोक्सच्या डाव्या गुडघ्यात दुखापत (Ben Stokes has injection in knee) झाल्याची माहिती समोर आली आहे. क्रिकइन्फोने ही माहिती दिली आहे. दुखापतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कॉर्टिसोनचे इंजेक्शन देखील देण्यात येतंय.

आणखी वाचा - IPL 2023: KKR कडून अचानक नव्या कॅप्टनची घोषणा; 'या' खेळाडूवर सोपवली जबाबदारी!

MS Dhoni चा हुकमी एक्का जखमी?

बेन स्टोक्स (Ben Stokes) म्हणजे धोनीचा (MS Dhoni) हुकमी एक्का, पुणेच्या संघाकडून खेळत असताना धोनीने त्याचा योग्य वापर करत धमाल केली होती. चेन्नईसाठी (CSK) तो एक्स फॅक्टर ठरू शकतो. मात्र, त्याला बॉलिंग करता येणार नसल्याने धोनी कोणता निर्णय घेणार या पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुखापतीमुळे स्टोक्स न्यूझीलंड दौऱ्यावर झालेल्या 2 कसोटी सामन्यांमध्ये फक्त 9 ओव्हर फेकू शकला होता. त्यामुळे चेन्नईकडून तो खेळणार की नाही, यावर चिंता व्यक्त केली जात होती.

Ben Stokes ला बॉलिंग जमेना!

माझी समजूत अशी आहे की तो (Ben Stokes) सुरुवातीपासूनच फलंदाज म्हणून जाण्यास तयार आहे. रविवारी त्याच्या गुडघ्यात इंजेक्शन दिल्याने तो अतिशय हलक्या पद्धतीने गोलंदाजी करत होता, असं बॅटिंग कोच माईक हसी (Michael Hussey) म्हणाला आहे.