पुणे : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 14 व्या सामन्यात (IPL 2022) कोलकाताने (KKR) मुंबईवर (MI) 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. आयपीएलच्या इतिहासात 5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबईने या मॅचमध्ये बॅटिंगने निराशा केली. कॅप्टन रोहित शर्माकडून (Rohit Sharma) या सामन्यात बॅटिंगने अनेक अपेक्षा होत्या. मात्र रोहितने अवघ्या 12 बॉलमध्ये 3 धावाच केल्या. या खेळीसह आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी कॅप्टन रोहितच्या नावे नकोशा विक्रमाची नोंद झाली. (ipl 2022 kkr vs mi mumbai indians captain rohit sharma set bad record in ipl history)
रोहित आयपीएलमध्ये एकेरी आकड्यावर सर्वाधिक वेळा आऊट होणारा बॅट्समन ठरला आहे. रोहित आतापर्यंत 10 धावांच्या आत एकूण 61 वेळा आऊट झाला आहे. याचाच अर्थ असा की, रोहित 0 ते 9 या धावसंख्येदरम्यान एकूण 61 वेळा बाद झाला आहे. यानंतर दिनेश कार्तिकचा नंबर आहे.
रोहित शर्मा - 61
दिनेश कार्तिक - 60
सुरेश रैना - 53
रॉबिन उथप्पा - 52
शिखर धवन - 48
रोहितच्या नावावर आणखी एक नकोसा रेकॉर्ड झाला. रोहितची 2017 पासून आयपीलमधील कामगिरीत मोठी घसरण झालीय. रोहितने 2017 पासून एकूण 73 डावांमध्ये 1 हजार 791 धावा केल्या आहेत. रोहितची या दरम्यान 26.33 इतकी सरासरी राहिली आहे. रोहितला गेल्या 5 वर्षांमध्ये फक्त 11 वेळाच अर्धशतक लगावता आलं आहे.