मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादची सुरुवात काही चांगली झालेली नाही. तर दुसरीकडे हैदराबादचा कर्णधार सतत चुकीच्या निर्णयाचा शिकार होताना दिसतोय. 4 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात पुन्हा एकदा अंपायरच्या चुकीचा फटका कर्धणार केन विलियम्सनला बसला आहे. लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये ही घटना घडली.
लखनऊविरूद्धच्या सामन्यात केन अवघ्या 16 रन्सवर माघारी परतला होता. मात्र त्याला नो बॉलवर आऊट दिल्याचं आता समोर आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अंपायरच्या चुकीचा मोठा फटका केन विलियम्सनला बसला आहे.
हैदराबाद फलंदाजी करत असताना चौथ्या ओव्हरमध्ये आवेश खानने केन विलियम्सनची विकेट काढली. दरम्यान केन आऊट झाल्यानंतर एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये हे स्पष्टपणे दिसून येतंय की, ज्यावेळी केन आऊट झाला तेव्हा 30 यार्डांच्या बाहेर फक्त तीन फिल्डर हजर होते, म्हणजेच संपूर्ण वर्तुळात 6 फिल्डर उपस्थित होते.
जेव्हा याची माहिती मिळाली त्यावेळी सनरायझर्स हैदराबादच्या मॅनेजमेंटने एक्शनमध्ये आलं आहे. यासंदर्भात मॅनेजमेंटने बीसीसीआयकडे तक्रार देखील दाखल केली आहे.
This was the field setting on the ball that Kane Williamson got out but no one noticed enough to give a no ball.#IPL2022 #BCCI @IPL pic.twitter.com/U1dLYqpb7a
— Aryan Gupta (@AryanCaptures) April 4, 2022
पहिल्या सामन्यात देखील केन विलियम्सनला चुकीच्या निर्णयाचा फटका बसला होता. हैदराबाद फलंदाजी करत असताना राजस्थानकडून प्रसिद्ध कृष्णा दुसरी ओव्हर टाकत होता. या ओव्हरमधील चौथा बॉल विलियम्सनच्या बॅटला कट लागून विकेटकीपर संजू सॅमसनच्या हातात गेला. मात्र चेंडू संजूच्या हाती लागला, पण तो पकडू शकला नाही. यावेळी बॉल हवेत उडाला आणि स्लिपला उभ्या असलेल्या देवदत्त पडिकलकडे गेला. संजूकडून चुकलेल्या चेंडू देवदत्तने पकडला.
मात्र यावेळी तो मैदानावर उपस्थित असलेल्या अंपायरला कॅच पकडला गेला की बॉल जमिनीला लागला हे समजलं नाही. अंपायरने विलियम्सन आऊट असल्याचा सॉफ्ट सिग्नल दिला. आणि हे तपासण्यासाठी थर्ड अंपायरला विनंती केली. यावेळी थर्ड अंपायरने प्रत्येक अँगलमधून रिप्ले पाहिला आणि विलियम्सनला आऊट दिला. याच मुद्द्यावरून वाद निर्माण झाला.