मुंबई : आयपीएलमध्ये कोलकाता टीमला पुन्हा एकदा अपयशाचा सामना करावा लागला. लखनऊने 75 धावांनी कोलकातावर विजय मिळवला आहे. कोलकाता प्लेऑफपर्यंत पोहोण्याची शक्यता फार कमी आहे. जवळपास संपुष्टात आली आहे. त्यामुळे श्रेयस अय्यर खूप जास्त नाराज असल्याचं दिसलं.
आतापर्यंत टॉस जिंकले पण सामना जिंकण्यात काही यश आलं नाही. टॉस हरलो असतो तर बरं झालं असतं. ज्यामुळे समोरच्या टीमला तरी निर्णय घेता आला असता.
आम्ही बॉलिंग आणि बॅटिंग दोन्हीमध्ये कमी पडलो. लखनऊने पॉवरप्लेमध्ये उत्कृष्ट बॉलिंग केली. त्यांच्या टीमने पावरप्लेमध्ये बॅटिंगही चांगली केली. मधल्या ओव्हर्समध्ये आम्हाला चांगली संधी होती. मात्र त्याचा फायदा घेता आला नाही.
श्रेयस म्हणाला की आम्ही बॅटिंगमध्ये कमी पडलो. आम्ही टॉस हरलो असतो तर बरं झालं असतं. कारण आम्ही आमच्या खेळात योग्य ठरू शकलो नाही. आम्ही घेतलेले निर्णय चुकले. पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये आम्हाला सुधारणा करावी लागेल. पुढील सामन्यात सुधारणा करण्याचा आमचा प्रयत्न राहिलं असंही तो म्हणाला.
लखनऊ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 75 धावांच्या फरकाने धमाकेदार विजय मिळवला आहे. या विजयासह लखनऊने गुजरातला पछाडत पॉइंट्सटेबलमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आहे. लखनऊ 16 पॉइंट्ससह पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे.