IPL 2022 Mega Auction | दिल्ली 'या' खेळाडूंना रिटेन करणार नाही, दिग्गजाची माहिती, म्हणाला....

आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) आता अवघे 4 महिने राहिले आहेत. आयपीएलचा 15 वा हंगाम (IPL 15) भारतात पार पडणार आहे.    

Updated: Nov 23, 2021, 03:30 PM IST
IPL 2022 Mega Auction | दिल्ली 'या' खेळाडूंना रिटेन करणार नाही, दिग्गजाची माहिती, म्हणाला.... title=

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) आता अवघे 4 महिने राहिले आहेत. आयपीएलचा 15 वा हंगाम (IPL 15) भारतात पार पडणार आहे. या मोसमात 2 नवे संघ सहभागी होणार आहेत. तसेच मेगा ऑक्शनसुद्धा (Ipl Mega Auction 2022) पार पडणार आहे. यामुळे प्रत्येक संघात मोठे फेरबदल होणार आहेत. त्यामुळे 15 वा मोसम हा क्रिकेट प्रेमीसाठी थ्रीलर असा असणार आहे. दरम्यान याआधी दिल्ली कॅपिट्ल्सचा (Delhi Capitals) अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) फ्रँचायजी कोणत्या खेळाडूंना रिटेन (कायम) ठेवणार, याबाबतचा खुलासा केला आहे. (ipl 2022 delhi capitals senior spinner ravichandran ashwin reveals  2 players name  who unlikely not retained by delhi in ipl 15 season)

आश्विन काय म्हणाला?

"अश्विनने आयपीएल 2022 मेगा ऑक्शनबाबत खुलासा केलाय. मला नाही वाटत की दिल्ली मला संघात कायम ठेवेल. जर रिटेन केलं असतं तर मला समजलं असतं", असं अश्विनने स्पष्ट केलं. अश्विन त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलत होता. 

श्रेयस अय्यरबाबत काय म्हणाला?

अश्विनने आणखी एक धक्कादायक माहिती दिली. दिल्ली श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यालाही रिटेन करणार नसल्याचंही संकेत अश्विनने दिले. श्रेयसला आयपीएलच्या 14 व्या मोसमाच्या सुरुवातील दुखापत झाली होती. यानंतर रिषभ पंतला (Rishabh Pant) कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

दिल्ली कोणाला कायम राखणार?
 
सर्व 8 संघ प्रत्येकी 4 खेळाडूंना कायम ठेवू शकते. दिल्ली फ्रँचायजी रिषभ पंत, पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि शिमरॉन हेटमायर (shimron hetmyer) या तिघांना कायम ठेवू शकते. कारण या तिघांमध्ये सामना निर्णायक क्षणी एकहाती फिरवण्याची क्षमता आहे.

पृथ्वी गेल्या वर्षभरापासून धमाकेदार कामगिरी करतोय. पंतही कॅप्टन्सी, बॅटिंग आणि विकेटकीपिंग अशा तिन्ही आघाड्यांवर शानदार कामगिरी करतोय. तसंच शिमरॉनही आक्रमक फलंदाज आहे. यामुळे दिल्ली यांना कायम ठेवू शकते.

15 व्या मोसमापासून 2 नवे संघ

आयपीएलच्या 15 व्या हंगामात लखनऊ आणि अहमदाबाद हे नवे 2 संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे एकूण 10 संघ विजेतेपदासाठी आमनेसामने भिडणार आहेत. तसेच या मोसमात अनेक बदल होणार आहेत.