IPL 2022 : जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्रसिंह धोनीने आज सीएसके संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर अष्टपैलू रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) चेन्नई सुपर किंग्जचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. गुरुवारी (24 मार्च) महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. त्यामुळे त्याच्या जागी जडेजाकडे संघाची कमान आली आहे. धोनी (Dhoni) आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून फ्रँचायझीचा कर्णधार होता. कर्णधार बनल्यानंतर जडेजाने आपल्यासमोर महान खेळाडूचे स्थान भरुण काढण्याचे मोठे आव्हान असल्याचे म्हटले आहे. (Ravindra Jadeja First Reaction after become captain of CSK)
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ चार वेळा आयपीएलचा चॅम्पियन (IPL Champion) बनला. याशिवाय दोन वेळा तो चॅम्पियन्स लीग टी-20 जिंकण्यात यशस्वी ठरला. चेन्नई सुपर किंग्जने जडेजाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये जडेजाने कर्णधार बनल्यानंतर पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. जडेजा म्हणाला, "मला खूप छान वाटत आहे, पण सध्या मी खूप मोठ्या खेळाडूच्या शूजमध्ये पाय ठेवत आहे असा विचार करत आहे."
जडेजा व्हिडिओमध्ये पुढे म्हणाला, "माही भाई (महेंद्रसिंग धोनी) ने चेन्नई सुपर किंग्जसाठी वारसा तयार केला आहे. मला त्याला पुढे नेण्याची संधी मिळत आहे. मला जास्त काळजी करण्याची गरज नाही. ते अजूनही आमचे आहेत. मला जे काही प्रश्न असतील, मी त्यांना जाऊन विचारेन. त्यामुळे मला त्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही."
आयपीएलचा १५ वा सीझन (IPL 15) २६ मार्चपासून सुरू होत आहे. उद्घाटनाचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR VS CSK) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांना नवे कर्णधार असतील. कोलकाताने यावेळी श्रेयस अय्यरला कर्णधार बनवले आहे. जडेजाला वरिष्ठ पातळीवर कर्णधारपदाचा अनुभव नाही, पण अय्यरने दिल्ली कॅपिटल्सचे यशस्वी नेतृत्व केले आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघ : रवींद्र जडेजा (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी, मोईन अली, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, अंबाती रायुडू, ड्वेन ब्राव्हो, रॉबिन उथप्पा, दीपक चहर, केएम आसिफ, तुषार देशपांडे, शिवम दुबे, महिष टेकश्ना, राजकुमार हंगेकर, सिमरजीत सिंग, डेव्हॉन कॉनवे, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, अॅडम मिलने, सुभ्रांशु सेनापती, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सी हरी निशांत, एन जगदीसन, ख्रिस जॉर्डन, के भगत वर्मा.