IPL 2022 | 'यॉर्कर किंग' लसिथ मलिंगाचा हा मोठा रेकॉर्ड ब्रेक होणार

मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indias) खेळणाऱ्या 'यॉर्कर किंग' लसिथ मलिंगाचा (Lasith Malinga) गेल्या अनेक वर्षांपासून सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड हा अबाधित आहे.  

Updated: Mar 24, 2022, 07:52 PM IST
IPL 2022 | 'यॉर्कर किंग' लसिथ मलिंगाचा हा मोठा रेकॉर्ड ब्रेक होणार title=

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरुवात होतेय. यावेळेस एकूण 10 संघ ट्रॉफीसाठी भिडणार आहेत. सर्व संघांनी या मोसमासाठी जोरदार सराव केला आहे. मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indias) खेळणाऱ्या 'यॉर्कर किंग' लसिथ मलिंगाचा (Lasith Malinga) गेल्या अनेक वर्षांपासून सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड हा अबाधित आहे. मात्र या मोसमात हा रेकॉर्ड ब्रेक होणार हे निश्चित आहे. (ipl 2022 csk dwayne bravo have chance to break mumbai indians lasith malinga most wickets record)

मलिंगाचा हा रेकॉर्ड ब्रेक करण्याची सर्वाधिक संघी ही परदेशी खेळाडूंना आहे. चेन्नईकडून खेळणाऱ्या ड्वेन ब्राव्होला हा रेकॉर्ड ब्रेक करण्याची मोठी संधी आहे. 

आयपीएलमध्ये लसिथ मलिंगाने 122 सामन्यात 170 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर मलिंगाच्या खालोखाल ड्वेन ब्राव्हो आहे. ब्राव्होने 151 सामन्यात 167 विकेट्सने मिळवल्या आहेत. 

ब्राव्होला मलिंगाचा हा रेकॉर्ड मोडण्यासाठी अवघ्या 4 विकेट्सची गरज आहे. ब्राव्होने 4 विकेट्स घेतल्यानंतर तो मलिंगाला मागे टाकेल. सोबतच ब्राव्हो आयपीएलमधील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरेल.  

भारतीय गोलंदाजांना मलिंगाचा हा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे, मात्र ती असून नसल्यासारखी. कारण सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अमित मिश्रा तिसऱ्या तर पियूष चावला चौथ्या स्थानी आहे. हे दोघेही अनसोल्ड राहिले. 

हरभजन सिंह 5 व्या स्थानी आहे. मात्र त्याने निवृत्ती घेतलीय. यानतंर सहाव्या स्थानी आर अश्विन आहे. अश्विनने 167 मॅचमध्ये 145 विकेट्स घेतल्यात. मात्र दोघांच्या विकेट्समधील अंतर पाहता सध्या तरी हे शक्य नसल्याचंच चित्र आहे.