IPL 2021 : वडील चालवायचे रिक्षा ; भावाची आत्महत्या, तरीही हा खेळाडू बनला स्टार

चेतन सकरियाची सामन्यात शानदार गोलंदाजी

Updated: Apr 13, 2021, 07:36 AM IST
IPL 2021 : वडील चालवायचे रिक्षा ; भावाची आत्महत्या, तरीही हा खेळाडू बनला स्टार  title=

नवी दिल्लीः आयपीएल 2021 (IPL 2021) च्या चौथ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज (RR vs PBKS) चे संघ मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर एकमेकांना भिडले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 221 धावांची मोठी धावसंख्या उभारली. पंजाबचे फलंदाजांनी राजस्थानच्या सर्व गोलंदाजांना संधीचं दिली नाही. तर राजस्थानकडून पदार्पण करणाऱ्या चेतन सकरिया(Chetan Sakariya)याने या सामन्यात शानदार गोलंदाजी केली.

या सामन्यात सकरियाने (Chetan Sakariya)शानदार गोलंदाजी करत केवळ 31 धावा देऊन 3 महत्त्वाच्या विकेट घेतल्या.

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चांगली गोलंदाजी करणार्‍या 23 वर्षीय चेतन सकरिया (Chetan Sakariya) याच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत वाईट होती. ईएसपीएनच्या दिलेल्या माहितीनुसार, त्याला आपल्या बहिणीचे फी भरावी लागते आणि तिचे लग्नही करुन द्यायचे आहे. इतकेच नव्हे तर सकरीयाचे संपूर्ण कुंटुंब एक रुम आणि एका हॉलमध्ये राहते. म्हणून आता त्याला स्वतःसाठी घर घ्यायचे आहे. 

सकरिया (Chetan Sakariya)ने सांगितले की, त्याचे वडील टेम्पो चालवत असत. त्यांनी 2 वर्षांपूर्वी नोकरी सोडली. 5 वर्षांपासून त्याच्या घरी टीव्ही देखील नाही. आपल्या मित्राच्या घरी त्याला मॅच पाहावी लागे.

चेतन सकरियाच्या अडचणी इथे संपत नाहीत. यावर्षी जानेवारीत त्याच्या भावानेही आत्महत्या केली. सकरिया त्यावेळी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळत होता आणि तो घरीही नव्हता. स्पर्धेदरम्यान त्याच्या कुटुंबाने ही बातमी त्याला कळू दिली नाही. जेव्हा सकारिया घरी परत आला, तेव्हा देखील आपला भाऊ वारला हे त्याला ठाऊक नव्हते.