मुंबई: चेपॉक स्टेडियमवर झालेल्या हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात हैदराबाद संघाला पुन्हा एकदा लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. सुरुवात जरी चांगली झाली असली तरी शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र हैदराबाद संघ सामन्यावर पकड मजबूत ठेवण्यात कमी पडला. मुंबई इंडियन्स संघाने हैदरबादवर 13 धावांनी दणदणीत विजय मिळवला. मुंबई इंडियन्स संघाचा दुसरा विजय आहे. तर हैदराबाद संघाला सलग तीन वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे.
मुंबई इंडियन्स संघाने हैदराबादसमोर 151 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादने पावरप्ले पर्यंत चांगली सुरुवात केली. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांना अपयश मिळालं. 137 वर सर्व संघ आऊट झाल्यानं पुन्हा एकदा हाती निराशाच पदरात पडली.
मनीष पांडेने 7 चेंडूमध्ये 2 धावा केल्या आणि त्यानंतर तंबुत परतला. पहिल्या 6 ओव्हरमध्ये हैदराबाद संघाने 57 धावांची खेळी केली. मुंबई इंडियन्स संघाच्या गोलंदाजांनी कमालीची कामगिरी केली आहे.
बंगळुरू विरुद्ध झालेल्या सामन्यात हैदराबाद संघ विजयाच्या दिशेनं जात असताना शेवटच्या 3 ओव्हरमध्ये कोहलीच्या संघाने हा निसटता विजय खेचून आणल्यानं हैदराबाद संघाचा पराभव झाला. कोलकाता विरुद्ध झालेल्या सामन्यातही हैदराबादचा दारुण पराभव झाला होता.
मुंबई इंडियन्स संघाला पहिल्या बंगळुरू विरुद्धचा सामन्यात अपयश हाती लागल्यानंतर त्यांनी त्यावर केलं. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघ 10 धावांनी जिंकला तर हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात 13 धावांनी विजय मिळाला आहे.