IPL 2021 : ब्रायन लाराला विराट कोहलीच्या या शिष्याला शतक झळकावून सामनावीर म्हणून बघायची इच्छा

ज्या खेळाडूंमध्ये टॅलेंटची कमतरता नसते, त्यांना संधी दिली जाते. जेव्हा अशा खेळाडूंना आपला खेळ दाखवण्याची संधी मिळते तेव्हा ते, कोणत्याही प्लॅटफॅार्मवर आपला खेळ दाखवायला सजं होतात.

Updated: Apr 17, 2021, 09:04 PM IST
IPL 2021 : ब्रायन लाराला विराट कोहलीच्या या शिष्याला शतक झळकावून सामनावीर म्हणून बघायची इच्छा title=

मुंबई:  आयपीएलच्या प्रत्येक सीझनमध्ये आपल्याला दरवर्षी नव-नवीन तारे मिळत असतात. ज्या खेळाडूंमध्ये टॅलेंटची कमतरता नसते, त्यांना संधी दिली जाते. जेव्हा अशा खेळाडूंना आपला खेळ दाखवण्याची संधी मिळते तेव्हा ते, कोणत्याही प्लॅटफॅार्मवर आपला खेळ दाखवायला सजं होतात.

गेल्या वर्षी कोविड -19 मुळे आयपीएल संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळला गेला होता. तो सीझन विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा सलामीवीर देवदत्त पाडिक्कलचा होता. डाव्या हाताने खेळणाऱ्या या फलंदाजाने आपल्या खेळामुळे सर्वांनाच प्रभावित केले आहे.

वेस्ट इंडीयनचा महान फलंदाज ब्रायन लाराने कबूल केले आहे की, पडिक्कलमध्ये काही सुधारणा आवश्यक आहे, पण हा फलंदाज यंदाच्या सीझनमध्येही चांगली कामगिरी करेल.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळताना पडिक्कलने धावांचा पाऊस पाडला होता. यावर्षी हा सलामीवीर कोविड -19 च्या लागणमुळे सामने खेळू शकला नाही. परंतु सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने 11 धावा केल्या आहेत. या हंगामात लाराला पेडिक्कलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

एक शतक मारताना पाहायचे आहे

स्टार स्पोर्ट्सच्या 'सिलेक्ट डगआउट लाइव्ह फीड' कार्यक्रमात लारा म्हणाला, "पडिककल एक शानदार प्रतिभा आहे. गेल्या वर्षी त्याने पाच अर्धशतके झळकावली होती, त्याने चांगली फलंदाजी केली होती, त्यात विराट कोहलीशी चांगली भागीदारी ही केली. मला त्याला आयपीएल -2021 मध्ये रन्स करणारा, तर काही मॅन ऑफ दी मॅच घेताना आणि काही शतके झळकावताना पहायचे आहे. त्यासाठी त्याला काही गोष्टींमध्ये सुधारणा कराव्या लागतील. मला आशा आहे की, त्याने या मधल्या वेळेत आपल्या खेळात सुधारणा केली असेल आणि आता या आयपीएलमध्ये तो चमकदार कामगिरी करेल."

आतापर्यंतचा पेडीकलचा खेळ

आयपीएल 2020 मध्ये पडिक्कल रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघाकडून खेळायला मैदानात उतरला होता. या हंगामात, त्याने 15 सामने खेळले आणि 473 धावा केल्या. यादरम्यान त्याने पाच अर्धशतके झळकावली आणि 74 धावांची त्याची सर्वोच्च धावसंख्या गाठली होती. त्याचा स्ट्राइक रेट 125 होता. त्याने पहिल्या चार सामन्यात तीन अर्धशतके झळकावली होती. असे करणारा तो पहिला फलंदाज आहे. या कामगिरीमुळे, देवदत्त सीझनच्या शेवटी 'इमर्जिंग प्लेयर ऑफ दी टूर्नामेंट' म्हणून निवडला गेला.

देवदत्त पडिक्कलने नुकताच विजय हजारे ट्रॉफीमध्ये चमत्कार केला आहे आणि सात सामन्यांत 737 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने चार शतके आणि तीन अर्धशतके झळकावली. त्याने आतापर्यंत 15 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 34.88 च्या सरासरीने 907. 20 रन्स, तर लिस्ट ए सामन्यात 86.68 च्या सरासरीने आणि 33रन्स आणि टी -20 सामन्यांमध्ये 43.82 च्या सरासरीने 1271 रन्स केले आहेत.