IPL 2021 KKR vs CSK : Dhoni is The Boss! चेन्नईनं पटकावलं चौथ्यांदा जेतेपद

मुंबईनंतर सर्वाधिक जेतेपद जिंकणारा चेन्नई सुपरकिंग्स संघ ठरला आहे. 

Updated: Oct 15, 2021, 11:53 PM IST
IPL 2021 KKR vs CSK : Dhoni is The Boss! चेन्नईनं पटकावलं चौथ्यांदा जेतेपद title=

दुबई: महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई संघाने चौथ्यांदा जेतेपद मिळवलं आहे. कोलकाता संघाने पहिल्यांदा टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 192 धावांचा डोंगर रचला. कोलकाता संघाला 193 धावांचं लक्ष्य दिलं. कोलकाताला 193 धावांचं लक्ष्य गाठणं कठीण झालं. चेन्नईने कोलकाता संघावर 27 धावांनी विजय मिळवला आहे. कोलकाता संघाने 165 धावा केल्या. कोलकाता संघाने सुरुवात चांगली केली. मात्र त्यानंतर एकामागे एक फलंदाज तंबुत परतले. मुंबईनंतर सर्वाधिक जेतेपद जिंकणारा चेन्नई सुपरकिंग्स संघ ठरला आहे. 

चेन्नई संघाने 9 वर्षांपूर्वीचा आपला बदला पूर्ण केला. कोलकाता संघाला अंतिम सामन्यात पराभूत करून IPL 2021ची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. शुभमन गिलने 43 बॉलमध्ये 51 धावा केल्या. तर 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं व्यंकटेश अय्यरने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर तोही आऊट झाला. नितिश राणाला आपलं धावांचं खातं उघडण्यात अपयश आलं. सुनिल नरेन 2, इयोन मॉर्गन 4 आणि दिनेश कार्तिक 9 धावा करून तंबुत परतले. शाकीब अल हसन डक आऊट झाला आहे. 

चेन्नई विरुद्ध कोलकाता महाअंतिम सामन्यात चेन्नई संघाने धावांचा डोंगर उभा केला. ऋतुराज गायकवाडने 27 बॉलमध्ये 32 धावा केल्या. 1 षटकार आणि 3 चौकार ठोकले. तर फाफ डुप्लेसीने कमालीची खेळी केली आहे. त्याने 59 बॉलमध्ये 86 धावा केल्या. यामध्ये त्याने 7 चौकार आणि 3 षटकार ठोकले. 

रॉबिन उथप्पाने 15 बॉलमध्ये 31 धावा केल्या. मोईन अलीने 3 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीनं 20 बॉलमध्ये 37 धावा केल्या. कोलकाता संघासमोर 193 धावांचं लक्ष्य ठेवलं. कोलकाता संघाने टॉस जिंकल्याने चेन्नई संघाला पहिली फलंदाजी करण्याची वेळ आली. फाफ ड्युप्लेसीने कमालीची कामगिरी केली आहे. त्याने आणि ऋतुराजने मिळून जवळपास 90 धावांचा पल्ला गाठला. 

चेन्नई संघाने याआधी तीनवेळा चॅम्पियनशिप जिंकली आहे. याआधी 2010, 2011 आणि 2018 मध्ये चेन्नईनं धोनीच्या नेतृत्वामध्ये आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती. आता पुन्हा एकदा चेन्नई संघाला चौथ्यांदा चॅम्पियन्सची ट्रॉफी मिळवण्यात यश आलं आहे.