पुणे : आयपीएलच्या 14 व्या मोसमात (IPL 2021) चेन्नईने (CSK) कोलकातावर (KKR) 27 धावांनी विजय मिळवत चौथ्यांदा ट्रॉफी जिंकली. विजयानंतर चेन्नईच्या खेळाडूंनी मैदानात जोरदार सेलिब्रेशन केलं. ट्रॉफी जिंकल्यानंतर चेन्नईचे खेळाडू आपआपल्या घरी परतले. मराठमोळ्या पुणेकर ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) 4 वा मोसम गाजवलं. ऋतुराजने या मोसमात सर्वाधिक धावा चोपल्या. यासह तो ऑरेन्ज कॅप (IPL 2021 Orange Cap) होल्डर ठरला. ट्रॉफी जिंकल्यानंतर ऋतुराज आपल्या पुण्यातील घरी परतला. तेव्हा त्याचं कुटुंबियांकडून जंगी स्वागत (Ruturaj Gaikwad Grand Welcome) करण्यात आलं. या स्वागताचा व्हीडिओ सीएसकेच्या ट्विटरवरुन शेअर करण्यात आला आहे. (IPL 2021 Chennai super kings Orange Cap winner batsman Ruturaj Gaikwad grand welcome at pune)
ऋतुराजच्या स्वागतासाठी त्याच्या चाहत्यांनी घराबाहेर पिवळ्या रंगाच्या फुग्यांनी सजावट केली होती. ऋतुराजचं भारतीय परंपरेनुसार स्वागत करण्यात आलं. यावळेस ऋतुराजचा साधेपणा सर्वांना भावला.
काय आहे व्हीडिओत?
सीएसकेने शेअर केलेला हा अवघ्या 27 सेकंदाचा व्हीडिओ आहे. त्याचं स्वागत करण्यासाठी कुटुंबिय उपस्थित होते. तसेच ऋतुराजला पाहण्यासाठी त्याच्या शेजाऱ्यांसह चाहत्यांनी एकच गर्दी केली. ऋतुराज गाडीतून अनवाणी पायाने उतरला. त्याच्या पायावर पाणी टाकलं. ऋतुराजची त्याच्या कुटुंबियांनी दृष्ट काढली. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
ऋतुराजची या मोसमातली कामगिरी
ऋतुराजने कोलकाता विरुद्धच्या अंतिम सामन्यात 32 धावांची खेळी केली. यासह त्याने ऑरेन्ज कॅप पटकवली. ऋतुराज या मोसमात एकूण 16 सामने खेळला. यामध्ये त्याने 136.26 च्या स्ट्राईक रेट आणि 45.35 सरासरीने 635 धावा चोपल्या. यामध्ये त्याने 4 अर्धशतकं आणि 1 शतक झळकावलं. तसेच ऋतुराजने 64 चौकार आणि 23 गगनचुंबी सिक्स खेचले. ऋतुराज या मोसमात सर्वाधिक चौकार ठोकणारा फलंदाज ठरला.
Mersal Arasan Home #WhistlePodu #Yellove@Ruutu1331 pic.twitter.com/SlOFnkvF9o
— Chennai Super Kings - Mask Pdu Whistle Pdu! (@ChennaiIPL) October 17, 2021