IPL 2021 : 'वाढत्या कोरोनामुळे भारतात मला सुरक्षित वाटत नव्हतं'

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील खेळाडू आणि ऑस्ट्रेलियाच्या स्पिनरने एक धक्कादायक विधान केलं आहे. 

Updated: Apr 28, 2021, 12:34 PM IST
IPL 2021 : 'वाढत्या कोरोनामुळे भारतात मला सुरक्षित वाटत नव्हतं' title=

मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील खेळाडू आणि ऑस्ट्रेलियाच्या स्पिनरने एक धक्कादायक विधान केलं आहे. BCCIचं कडक बयो बबल असून देखील त्याने केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर यावरून चर्चा होत आहे. स्पिनरने मला वाढत्या कोरोनामुळे भारतात सुरक्षित वाटत नव्हतं असं विधान केलं आहे. 

नुकतंच भारतातून ऑस्ट्रेलियात माघारी गेलेला खेळाडू एडम झम्पाने हे विधान केलं आहे. बायो बबलमध्ये असुरक्षित वाटत असल्याचा त्याने दावा केला आहे. IPL2021 गेल्या वर्षीप्रमाणे यावेळी देखील UAEमध्ये असायला हवा होता असंही त्याने म्हटलं आहे. 

एडम झम्पा कर्णधार विराट कोहलीच्या संघातून खेळत होता. त्याच्या सोबत केन रिचर्डसन आणि राजस्थान रॉयल्स संघातील एका ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूनं देखील IPLमधून माघार घेतली आहे. भारतापेक्षा यूएईमध्ये झम्पाला अधिक सुरक्षित वाटत होते. 

भारतात IPLघेण्यामागे राजकारणही जोडलं गेल्याचा दावा झम्पाने केला आहे. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही यूएईमध्ये IPLचं आयोजन करता आलं असतं पण तसं केलं नाही यावरून अनेक प्रश्न देखील अपस्थित करण्यात आले आहेत. 

भारतात IPL नंतर टी 20 वर्ल्ड कप देखील होणार आहे. IPLमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये एकदाही एडम झम्पाला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. गेल्या वर्षी देखील तो तीनच सामने खेळला होता. मला ट्रेनिंगदरम्यान प्रेरणा देखील मिळत नव्हती अशी खंत त्याने व्यक्त केली आहे. 

एकीकडे तीन ऑस्ट्रेलियाचे खेळाडू माघारी गेल्यानंतर आता उर्वरित खेळाडू काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. तर एका ऑस्ट्रेलियन खेळाडूने विमानाची व्यवस्था करण्याची ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला विनंती केली होती. ती विनंती देखील ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधानांनी फेटाळून लावली आहे. खेळाडूंनी आपली व्यवस्था करावी असं सांगण्यात आलं आहे. तर दुसरीकडे बीसीसीआय व्यवस्था करेल असा विश्वास सौरव गांगुली यांनी दिला आहे.