IPL 2021 RCB vs DC: स्टम्पमागून मॅक्सवेलच्या सिक्सवर ऋषभ पंतची मजेशीर कमेंट, व्हिडीओ

मॅक्सवेलच्या सिक्सनं पंतला आश्चर्याचा धक्का, मजेशीर कमेंटचा व्हिडीओ व्हायरल

Updated: Apr 28, 2021, 11:57 AM IST
IPL 2021 RCB vs DC: स्टम्पमागून मॅक्सवेलच्या सिक्सवर ऋषभ पंतची मजेशीर कमेंट, व्हिडीओ title=

मुंबई:  चेन्नई सुपरकिंग्स संघाच्या सामन्यादरम्यान धोनीचा स्टम्पमागून आलेला आवजाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. त्याच गुरूचा शिष्य ऋषभ पंत देखील स्लेजिंग करण्यात माहिर आहे. पण पंतचा स्लेजिंक ऐवजी एक मजेशीर कमेंट स्टम्पच्या माईकमध्ये कैद झाली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

आयपीएल 2021 च्या 22 व्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अतिशय रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटलसचा 1 रनने पराभव केला. ऋषभ पंतने मजेशीर कमेंट दिली आहे.

RCBच्या फलंदाजी दरम्यान सातव्या ओव्हरमध्ये अमित मिश्रा दिल्लीकडून गोलंदाजी करत होता. पाचव्या चेंडूवर ग्लॅन मॅक्सवेलने 85 मीटर सिक्स ठोकला. तो पाहून ऋषभ पंतलाही आश्चर्याचा धक्का बसला आणि 'बहुत तेज घुमाया ये तो' असं मजेशीर पद्धतीनं त्याने कमेंज केली. त्याची ही कमेंट स्टम्पच्या माइकमध्ये कॅच झाली आणि ती सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

IPL 2021 RCB vs DC: पराभवानंतर पंत झाला भावुक, कोहलीनं डोक्यावरून फिरवला हात, व्हिडीओ

बंगळुरू संघाच्या फलंदाजांनी कमाल केली आहे. ए बी डिव्हिलियर्सने एकहाती धावा काढल्या. 42 बॉलमध्ये 5 षटकार आणि 4 चौकार ठोकत 75 धावांची खेळी आहे. 

बंगळुरू संघाने 5 गडी मगावून 171 धावा केल्या. तर दिल्ली संघाने 4 गडी गमावून 170 धावा केल्या. एक रन कमी पडला नाहीतर मॅच सुपरओव्हरपर्यंत पोहोचली असती. एक रननं पराभव झाल्यामुळे दिल्ली संघातील खेळाडूंची मोठी निराशा देखील झाली आहे.