IPL 2020 : आज बंगळुरु विरुद्ध हैदराबाद यांच्यात रंगणार सामना

प्ले ऑफमध्ये जागा निश्चित करण्यासाठी आजचा सामना जिंकणं महत्त्वाचं

Updated: Oct 31, 2020, 06:01 PM IST
IPL 2020 : आज बंगळुरु विरुद्ध हैदराबाद यांच्यात रंगणार सामना title=

शारजाह : आरसीबीला प्ले ऑफमध्ये जागा निश्चित करण्यासाठी सनराइजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध शेवटच्या 2 सामन्यांपैकी एक सामना जिंकावा लागणार आहे. त्यानंतर 2 सामने गमवल्यानंतर ही आरसीबीचे 14 गुण कायम राहतील. तरी देखील चांगल्या रनरेटच्या आधारावर ते क्वालिफाय करतील. पण जर मोठ्या अंतराने पराभव झाला तर नेट रनरेटवर परिणाम होईल. ज्यामुळे ते बाहेर देखील होऊ शकतात.

आयपीएलचा 52 वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि सनराइजर्स हैदराबाद (SRH)यांच्यात रंगणार आहे. लागोपाठ 2 पराभवानंतर बंगळुरुचा संघ आज विजयासाठी मैदानात उतरेल. प्ले ऑफमध्ये जागा निश्चित करण्यासाठी त्यांना आजचा सामना जिंकावा लागेल. आज शारजाह येथे संध्याकाळी 7:30 वाजता सामना होणार आहे.

चेन्नई सुपरकिंग्स प्ले ऑफमधून जवळपास बाहेर झाली आहे. गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करत त्यांनी त्यांचं गणित देखील बिघडवलं. फक्त मुंबई इंडियंस प्लेऑफमध्ये निश्चित झाली आहे. पण इतर सहा टीम अजूनही स्पर्धेत आहेत. यामध्ये आरसीबी आणि सनराइजर्स हैदराबादचा देखील समावेश आहे.

चेन्नई आणि मुंबईकडून पराभवानंतर ही आरसीबी हैदराबादच्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहे. हैदराबादला देखील आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय आवश्यक आहे.