IPL 2020 : 'प्ले ऑफ'मध्ये स्थान पक्कं करण्यासाठी भिडणार मुंबई- बंगळुरू

काय असेल विराटची रणनिती...   

Updated: Oct 28, 2020, 03:09 PM IST
IPL 2020 : 'प्ले ऑफ'मध्ये स्थान पक्कं करण्यासाठी भिडणार मुंबई- बंगळुरू  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : दुबईमध्ये सुरु असणाऱ्या ipl 2020 आयपीएलच्या 13 व्या हंगामात बुधवारी खेळवल्या जाणाऱ्या सामन्यामध्ये मुंबई आणि बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये चांगलीच लढत होणार असल्याचं चित्र आहे. या स्पर्धेतील 48 व्या सामन्यामध्ये दोन्ही संघांचं प्राथमिक ध्येय्य हे सामना जिंकत दोन गुणांसह प्ले ऑफमधील स्थान भक्कम करण्याकडे असेल. दरम्यान, या सामन्यात रोहित शर्मा मात्र दिसणार नसल्याची चिन्हं आहेत. 

यापूर्वी राजस्थानसोबत खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये मुंबईच्या संघाचा 8 विकेट्सनं पराभव झाला होता. तिथं बंगळुरूलाही यापूर्वीच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळं आता बुधवारच्या सामन्यात विजयी पताका उंचावत प्ले ऑफमध्ये स्थान भक्कम करण्यासाठीच हे दोन्ही संघ प्रयत्नशील असणार आहेत. 

काय सांगतात दोन्ही संघाचे आकडे.... ? 

आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात मुंबई आणि बंगळुरूचा संघ 26 वेळा आमनेसामने आला आहे. ज्यामध्ये मुंबईला 16 तर बंगळुरूला 10 वेळा विजय मिळवता आला आहे. त्यामुळं आकडेवारीनुसार मुंबईचं पारडं स्पष्टपणे जड दिसत आहे. 

एकिकडे संघांची कामगिरी कशी असेल याबाबतची चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे रोहित शर्माच्या फिटनेसबाबतही चर्चा सुरु आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळं मागील दोन सामन्यांमध्ये त्याला खेळता आलेलं नाही. सोमवारी तो नेट्समध्ये सराव करताना दिसला. याच दिवशी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली. पण, यामध्ये रोहितला मात्र वगळण्यात आलं. अद्यापही मुंबई संघ व्यवस्थापन किंवा बीसीसीआयकडून त्याच्या प्रकृतीबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. 

 

रोहितच्या अनुपस्थितीत मुंबईच्या संघाची धुरा सौरभ तिवारी, इशान किशन, क्विंटन डिकॉक यांच्यावर असेल. तर चांगल्या फॉर्ममध्ये असणारा हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पांडया हे खेळाडूही संघाचा आधार असतील. 
बंगळुरूच्या संघाविषयी सांगावं तर, विराट कोहली, एरन फिंच, देवदत्त पडिक्कल, एबी डिविलियर्स या खेळाडूंची सातत्यपूर्ण खेळी संघासाठी फायद्याची ठरु शकते. गोलंदाजीच्या बाबतीत दोन्ही संघाकडून सावधगिरीचीच पावलं चाकली जाण्याचं चित्र आहे. अशा या एकंदर गोळाबेरजेच्या गणितात नेमका कोणता संघ पुढे जातो हे सामना पुढे जाईल तसं स्पष्ट होणार आहे.