लज्जास्पद, भारतीय शोधतायत हिमा दासची जात

आयएएएफ वर्ल्ड अंडर-२० अथलॅटिक्स चॅम्पिअनशिपमध्ये ४०० मीटर प्रकारात हिमा दासनं सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला होता. 

Updated: Jul 16, 2018, 10:42 PM IST
लज्जास्पद, भारतीय शोधतायत हिमा दासची जात title=

मुंबई : आयएएएफ वर्ल्ड अंडर-२० अथलॅटिक्स चॅम्पिअनशिपमध्ये ४०० मीटर प्रकारात हिमा दासनं सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला होता. मात्र, या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक करण्यापेक्षा गुगलवर भारतीय तिची जात कोणती हे शोधतायत. त्यामुळे हिमा दासनं केलेली ऐतिहासिक कामगिरी भारतीयांसाठी महत्त्वाची आहे. की, तिची जात असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतोय. यआधी रिओ ऑलिम्पिकमध्ये रजत पदकविजेत्या सिंधूची जातही अशाच प्रकारे भारतीय शोधत होते.

दरम्यान, ट्रॅक इव्हेंटमध्ये गोल्ड जिंकणारी हिमा पहिली भारतीय महिला ठरली होती. १८ वर्षीय हिमानं ५१.४६ सेकंदात ४०० मीटरचं अंतर पार करत सुवर्णपदकाची कमाई केली होती.